Home /News /mumbai /

धावणारी 'बेस्ट' रांगायला लागली!

धावणारी 'बेस्ट' रांगायला लागली!

2008 मध्ये 16 कि.मी. प्रति तास धावणारी 'बेस्ट'च्या बसचा वेग आता 9 कि.मी. प्रति तासांवर येऊन ठेपलाय.

    स्वाती लोखंडे-ढोके, मुंबई, 29 ऑगस्ट : बेस्ट बस ही मुंबईची ओळख आहे. या 'बेस्ट'ला ग्रहण लागलंय मुंबईच्या ट्रॅफिकचं. वाढतच जाणाऱ्या गाड्यांच्या संख्येनं बेस्टची गती मंदावलीय. मागील दहा वर्षात 'बेस्ट'ची गती दुपटीने कमी झालीय. 2008 मध्ये 16 कि.मी. प्रति तास धावणारी 'बेस्ट'च्या बसचा वेग आता  9 कि.मी. प्रति तासांवर येऊन ठेपलाय. वाहनांच्या सख्येत झालेली विलक्षण वाढ, त्यामुळे निर्माण होणारी ट्रॅफिक जॅमची समस्या आणि विशेषतः बेशिस्तपणे वाहन चालविणारी मंडळींमुळे 'बेस्ट'च्या गतीला स्पीड ब्रेक लागलाय. 'बेस्ट'ला लागलेलं हे ग्रहण सुटता सुटत नसल्यामुळे 'बेस्ट'ची वाटचाल अधोगतीकडे सुरू आहे. गेल्या 31 वर्षापासून आनंदराव कदम हे 'बेस्ट'मध्ये चालक म्हणून कार्यरत आहेत. मागील 10 वर्षात ते कुलाबा ते अंधेरी या मार्गावर 4 फेऱ्या अगदी सहज करायचे. पण आता ट्रॅफिकमध्ये अडकावं लागत असल्यामुळे जेमतेम एक फेरी पुर्ण करेपर्यंत ड्युटी संपायची वेळ येते. मग काय एखाद्या छोट्या मार्गीवर बस चालवून आनंदराव आपला दिवस पुर्ण करतात. मागच्या दहा वर्षात 'बेस्ट'ची गती जवळपास दुपटीने कमी झालीय. 2008 साली 16 कि.मी. प्रति तास या वेगाने 'बेस्ट' धावत होती. तीचा वेग मंदावुन 2011 साली ती 14 कि.मी. प्रति तास या वेगाने धावू लागली. 2016 ला 'बेस्ट'ची गति आणखी कमी होउन ती 12 कि.मी. प्रति तास धावू लागली, आणि 2018 मध्ये 'बेस्ट'ची गती ही एक अंकी आकड्यावर येऊन 9 कि.मी. प्रति तास इतकी धावतेय. न्यूज18 लोकमतशी बोलताना बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबुरकर म्हणाले की, 'बेस्ट'च्या गतीला स्पीड ब्रेकर लागलाय तो वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे, ट्रॅफिक जॅममुळे आणि बेशिस्तपणे रस्त्यावर रिक्षा टॅक्सी आणि खाजगी वाहनं चालविणाऱ्यांमुळे. पण यावर उपाय असल्याचे ते म्हणाले. मुंबई महानगर पालिकेच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव म्हणाल्या की, सध्या मुंबईत खाजगी वाहनांची संख्या ही 35 लाख आहे. 'ट्रॅफिक जॅम'मुळे बस वेळेवर पोहोचत नाही म्हणून प्रवासी संख्याही घटत चाललीय. 2008 साली 450 कोटी रुपये असलेला तोटा आता 1000 कोटींवर जाऊन पोहोचलाय. 'बेस्ट' बसच्या गतीचा हा अडथळा बेस्टच्या प्रगतीतलाही मोठा अडथळा आहे. 'बेस्ट'च्या मार्गातील स्पीड ब्रेकर.. 2008 - 6 कि.मी. प्रति तास 2011 - 14 कि.मी. प्रति तास 2016 - 12 कि.मी. प्रति तास 2018 - 9 कि.मी. प्रति तास स्लॅब कोसळणारा तो थरारक VIRAL VIDEO कुठला ?
    First published:

    Tags: Best, Bus, Downfall, Mumbai, Traffic, अधोगती, ट्रॅफिक, बस, बेस्ट, मुंबई

    पुढील बातम्या