• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • मुंबईतील भिकाऱ्यांना मिळणार डोक्यावर छप्पर; विश्वास नांगरे पाटील यांची नवी मोहीम

मुंबईतील भिकाऱ्यांना मिळणार डोक्यावर छप्पर; विश्वास नांगरे पाटील यांची नवी मोहीम

मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी मुंबईतील एका दुर्लक्षित घटकासाठी पुढाकार घेतला आहे.

 • Share this:
  मुंबई, 13 फेब्रुवारी : मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी मुंबईतील एका दुर्लक्षित घटकासाठी पुढाकार घेतला आहे. मंदिर, धार्मिक संस्था, महाविद्यालये यांच्या गेटजवळ बसून भिक्षा मागणाऱ्या भिकाऱ्यांसाठी नांगरे पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी मोठी मोहीतच हाती घेतली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ते मुंबईतील भिकाऱ्यांना चेंबुरमधील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात पाठविण्यात येणार असून, तेथेच त्यांची सोय करण्यात येणार आहे. यासंदर्भात विश्वास नांगरे पाटील यांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून कळवले असून रस्त्यांवर भिकारी दिसल्यास त्यांनी रवानगी भिक्षेकरी केंद्रात करण्याचं आवाहन केलं आहे. याशिवाय पकडण्यात आलेल्या भिकाऱ्यांची कोरोना चाचणीदेखील करण्यात येणार आहे. सध्या ही मोहीम सुरू झाली असून आझाद मैदानातील 14 भिकाऱ्यांना पकडून भोईवाडा कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यांची कोविड चाचणी केल्यानंतर केंद्रात पाठवण्यात येईल. हे ही वाचा-आणखी एका मंत्र्याने ठाकरे सरकारचं वाढवलं टेन्शन; भाजप आक्रमक भिकाऱ्यांविरोधातील मोहिमेचं कारण मुंबईत हायवेपासून अनेक धार्मिक, शैक्षणिक संस्थेबाहेर भिकाऱी भीक मागताना आपण पाहतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून भिकाऱ्यांची टोळी कार्यरत असल्याच्या तक्रारी येत आहे. यामध्ये ही टोळी मुलांचं अपहरण करुन त्यांना अपंग करुन भीक मागण्यास सांगतात. तर काहींनी हा व्यवसायचं केला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी भिकाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: