Home /News /mumbai /

BMC इंजिनिअरनं प्रेमसंबंध ठेवण्यास दिला नकार, महिला बॅंक अधिकाऱ्यानं दिली हत्येची सुपारी

BMC इंजिनिअरनं प्रेमसंबंध ठेवण्यास दिला नकार, महिला बॅंक अधिकाऱ्यानं दिली हत्येची सुपारी

इंजिनिअरनं प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. याचा राग धरून या असिस्टंट मॅनेजरनं चक्क इंजिनिअरला ठार मारण्यासाठी सुपारी दिली.

    मुंबई, 10 नोव्हेंबर : मुंबई पोलिसांनी (Mumbai police) एका नामांकित बँकेच्या असिस्टंट मॅनेजरला अटक केली आहे. या अटकेचे कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या महिला असिस्टंट मॅनेजरचे मुंबई महानगरपालिकामध्ये (BMC) काम करत असलेल्या एका सब-इंजिनीअरवर प्रेम होते. मात्र या इंजिनिअरनं प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. याचा राग धरून या असिस्टंट मॅनेजरनं चक्क इंजिनिअरला ठार मारण्यासाठी सुपारी दिली. ही महिला मुंबईतील नामांकित बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे, तर ज्याची सुपारी दिली होती, ती व्यक्ती पालिकेत इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. इतकेच नाही तर ही सुपारी घेणारा तरुण हा बीएससी केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे. महिला असिस्टंट मॅनेजर आणि या इंजिनिअरचे अफेअर होते. मात्र इंजिनिअरनं प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला हे असाह्य झाल्यामुळे या महिलेनं त्याला ठार मारण्याचा निर्णय घेतला. वाचा-माणसांची हत्या करुन त्यांच्या मांसाचा बनवायचे लोणचं; परिसरात उडाली खळबळ ओडिशाचा रहिवासी बीएससीचा विद्यार्थी विजय प्रधान याला इंजिनिअरला मारण्यासाठी 1 लाखांची सुपारी देण्यात आली होती. रविवारी आरोपी महिला आणि मारेकरी एकमेकांना भेटले आणि प्लॅन करून घटनास्थळी पोहोचले. मात्र पोलिसांनी या दोघांना घटनास्थळी अटक केली आणि या इंजिनिअरचे प्राण वाचवले. मुंबई पोलीस दलातील एसीपी भीमराव इंदलकर यांनी सांगितले की, पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून या संदर्भात माहिती मिळाली होती. माहिती मिळताच वेळ न गमावता त्यांनी घटनास्थळी पोहोचले आणि या दोघांना अटक केली. वाचा-पुणे जिल्ह्यात महिलेचे डोळे निकामी करणारा आरोपी जेरबंद, अटकेनंतर केला अजब दावा माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई केल्याने इंजिनिअरचा जीव वाचला, मात्र आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे. या महिलेला सुपारी किलरचा नंबर कोणी दिला आणि त्याच्याकडे बंदूक, गोळ्या कुठून आल्या, याचा तपास सुरू आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: BMC, Crime news, Mumbai

    पुढील बातम्या