मुंबई 19 एप्रिल: चिथावणीखोर वक्तव्य करत सामाजिक शांतता भंग केल्याप्रकरणी अभिनेता एजाज खान याला मुंबई पोलिसांनी आज अटक केली होती. आज त्याला वांद्रे इथल्या न्यायालयाच हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बिग बॉसमुळे ते चर्चात आला होता. या आधीही अनेकदा तो वादग्रस्त वक्तव्य आणि भांडणांमुळे वादात सापडला होता. काही दिवसांपूर्वी त्याने फेसबुक लाईव्ह करत धार्मिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य केली होती. त्यानंतर त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावरून पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि एजाजला शनिवारी अटक करण्यात आली होती. 153A,121,117,188,501,504,505(2) या कलमानुसार ही कारवाई करण्यात आली.
खार पोलिसांचं एक पथक त्याच्या घरी गेलं आणि त्याला अटक केली. सामाजिक शांतता भंग होईल असं कुणीही वक्तव्य करू नये असं सरकारकडून वारंवार सांगितलं जात आहे. मात्र सोशल मीडियावरून सातत्याने अशी प्रक्षोभक वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे पोलिसांनी कडक भूमिका घेत कारवाई केली आहे. या आधीही एजाज खान अनेकदा वादात सापडला होता. त्याला पोलिसांनी या आधीही अटक केली होती.
एजाज खानचं हे लाइव्ह जवळपास 9 मिनिटांचं होतं. जे 67 हजार पेक्षा जास्त वेळा शेअर करण्यात आलं आहे. याशिवाय हे लाइव्ह 20 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. अतिशय भडक भाषा त्याने वापरली आहे.
Tik Tok व्हिडिओ तयार करून आव्हान देणं पडलं महागात, पोलिसांनी दाखवला हिसका!
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा लोकांवर कडक कारवाईचा इशारा दिला होता. महाराष्ट्रात अडकलेल्या सर्व कामगारांची काळजी आम्ही घेऊ. तुम्ही काळजी करू नका. या गरीबांच्या भावनांशी खेळ करू नका आग भडकविण्याचा प्रयत्न करू नका, असं काम करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
हे वाचा -
कल्याण-डोंबिवलीत कोरोना हॉटस्पॉट जाहीर, 122 पैकी 20 प्रभाग संवेदनशील
... आणि जेव्हा SP ने स्वत: ट्रॅक्टरला मारला धक्का, VIDEO VIRAL