Home /News /mumbai /

एसटी कर्मचाऱ्यांनंतर आता मुंबईत रिक्षा चालक आंदोलनाचं हत्यार उपसणार, कारण....

एसटी कर्मचाऱ्यांनंतर आता मुंबईत रिक्षा चालक आंदोलनाचं हत्यार उपसणार, कारण....

प्रातिनिधिक फोटो (सौजन्य : सोशल मीडिया)

प्रातिनिधिक फोटो (सौजन्य : सोशल मीडिया)

महागाईला कंटाळून अखेर हवालदिल झालेल्या मुंबईतील ऑटो रिक्षा चालकांनी आंदोलनाचं हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आपण सगळ्यांनी पाहिलं. त्यानंतर आता ऑटो रिक्षाचालक आंदोलन करणार आहेत.

    मुंबई, 28 एप्रिल : देशात सध्या कोरोना (corona) नंतर आता महागाईचं (inflation) मोठं संकट उभं राहिलं आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यापाठोपाठ सीएनजी गॅसचे देखील भाव वाढले आहेत. या महागाईला कंटाळून अखेर हवालदिल झालेल्या मुंबईतील ऑटो रिक्षा चालकांनी आंदोलनाचं हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आपण सगळ्यांनी पाहिलं. त्यानंतर आता ऑटो रिक्षा चालक आंदोलन करणार आहेत. ऑटोरिक्षा चालक मालक यांना सीएनजी इंधन कमी दराने (अनुदानीत दराने) मिळावे या मागणी करिता महानगर गॅस लिमिटेड (एम.जी.एल.) यांच्या बांद्रा कुर्ला संकुल येथील कार्यालयावर ऑटोरिक्षावाहनांसह मंगळवारी 17 मे रोजी सकाळी 11 वाजता मोठा मोर्चा काढण्याचं ठरवलं आहे. प्रदुषण मुक्त मुंबई या उद्देशासाठी ऑटोरिक्षा चालक मालकांना त्यांची वाहने सीएनजी इंधनावर चालविण्यास / नवीन खरेदी करण्यास सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व ऑटोरिक्षा आजमितीस सी. एन. जी. इंधनावर चालत आहेत. तसेच खाजगी वाहनांनी सुद्धा सी.एन.जी. इंधनावर चालावी यासाठी शासनाकडून प्रोत्साहन देण्यात आले. त्यामुळे सीएनजी इंधनावर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढतच आहे. ऑटोरिक्षा हे सार्वजनिक प्रवासी वाहतूकीचे साधन आहे, तसेच या वाहनातून लाखो प्रवासी रोज एम. एम. आर. क्षेत्रांमध्ये प्रवास करतात. मिळालेल्या माहितीनुसार सद्य स्थितीत भारतात मिळणारा सी. एन. जी. गॅसच्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात सी. एन. जी. परदेशातून आयात करण्यात येत आहे. परिणामत: सी. एन. जी. चे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. (22 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, परळीतल्या घटनेने बीड जिल्हा हादरला) महाराष्ट्र राज्य सरकारचा महानगर गॅस लि. (एम. जी. एल. ) मध्ये 10 टक्के भांडवली हिस्सा आहे. ऑटोरिक्षामधून होणारी प्रवासी वाहतूक ही सार्वजनिक सेवा असल्याने मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनने महानगर गॅस लिमिटेड (एम.जी.एल.) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भारतात उपलब्ध होणाऱ्या सी. एन. जी. चा जो दर भारत सरकार ठरवते, त्या दराने सी. एन. जी. ऑटोरिक्षा चालक मालकांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे. जेणेकरून ऑटोरिक्षा चालक मालकांना सी. एन. जी. कमी दरात उपलब्ध होईल व सामान्य नागरिकांना भाडे वाढीचा बोजा येणार नाही. या मागणीच्या पूर्तीसाठी 17 मे रोजी सकाळी 11 वाजता महानगर गॅस लिमिटेड (एम.जी.एल.) यांच्या बांद्रा कुर्ला संकुल येथील कार्यालयावर ऑटोरिक्षा चालक मालकांचा ऑटोरिक्षा वाहनांसह प्रचंड मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियन अध्यक्ष शशांक राव यांनी दिली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Autorickshaw driver, Mumbai, Protest, Strike

    पुढील बातम्या