'ड्रग्स'च्या सर्वात मोठ्या रॅकेटचा मुंबई ATSने केला पदार्फाश, 53 कोटींचा साठा जप्त

'ड्रग्स'च्या सर्वात मोठ्या रॅकेटचा मुंबई ATSने केला पदार्फाश, 53 कोटींचा साठा जप्त

या रॅकेटच्या माध्यमातून फक्त देशातच नाही तर विदेशातही ड्रग्स चा पुरवढा होत असल्याचा संशय ATSने व्यक्त केलाय. या प्रकरणाच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होतील अशी शक्यताही मुंबई पोलिसांनी व्यक्त केलीय.

  • Share this:

सर्वेश तिवारी, मुंबई 10 सप्टेंबर : मुंबई ATSने केलेल्या धाडसी कारवाईला मोठं यश मिळालाय. ATSने कारवाई करत ड्रग्सच्या काळ्या धंद्यातल्या सर्वात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचा दावा केलाय. मुंबई आणि नवी मुंबईत छापे घालत ATSने तब्बल 129 किलो MD ड्रग्स जप्त केलं असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत 53 कोटी एवढी आहे. या प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आलीय. या रॅकेटच्या माध्यमातून फक्त देशातच नाही तर विदेशातही ड्रग्स चा पुरवढा होत असल्याचा संशय ATSने व्यक्त केलाय. या प्रकरणाच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होतील अशी शक्यताही मुंबई पोलिसांनी व्यक्त केलीय. ATS ला या काळ्या धंद्याविषयी गुप्त माहिती मिळाली होती. त्याच्या आधारे 9 सप्टेबरला मध्य रात्री ATSने नवी मुंबईत छापे घालून दोन लोकांना अटक केली.

SPECIAL REPORT : अवघ्या 6 महिन्यात उर्मिला मातोंडकरांना का सोडावा लागला काँग्रेस

त्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे विक्रोळीत छापे घालण्यात आले. यो दोनही ठिकाणी जो साठा सापडला त्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत. या ठिकाणी पोलिसांना तब्बल 129 किलो ड्रग्स हाती लागलंय. त्याचबरोबर 1 कोटी 4 लाखाची रोकडही पोलिसांनी जप्त केलीय. या प्रकरणी गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सर्व माहिती गोळा केली. यासाठी एक खास पथक तयार करण्यात आलं होतं. या पथकाने ही कामगिरी फत्ते केल्याने पोलिसांना मोठं यश मिळालंय. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात या ड्रग्स माफियांचा कारभार चालत असल्याचं स्पष्ट झालंय. मुबंईतल्या उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये हे ड्र्ग्स पुरवलं जातं असावं असाही संशय व्यक्त केला जातोय.

काँग्रेसला एकाच दिवसात दुसरा धक्का, उर्मिलानंतर आणखी एका नेत्याचा राजीनामा

या प्रकरणाच्या चौकशीत अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. या माफियांचं मोठं नेटवर्क असून त्यांची पोहोचही मोठी असण्याची शक्यता आहे. या सर्व आरोपींना उद्या कोर्टात हजर केलं जाणार असून त्यांच्या चौकशीसाठी ATS पोलीस कोठडीची मागणी करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: mumbai ats
First Published: Sep 10, 2019 09:21 PM IST

ताज्या बातम्या