मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई ATS ची मोठी कारवाई, बनावट दस्तऐवजासह बांगलादेशी नागरिकाला अटक

मुंबई ATS ची मोठी कारवाई, बनावट दस्तऐवजासह बांगलादेशी नागरिकाला अटक

 एकूण 85 बांगलादेशी नागरिकांना बनावट ओळखपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून दिल्याची धक्कादायक माहिती समोर

एकूण 85 बांगलादेशी नागरिकांना बनावट ओळखपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून दिल्याची धक्कादायक माहिती समोर

एकूण 85 बांगलादेशी नागरिकांना बनावट ओळखपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून दिल्याची धक्कादायक माहिती समोर

मुंबई, 14 डिसेंबर: बांगलादेशी घुसखोर नागरिकाविरुद्ध (bangladeshi people) मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने (Anti Terrorism Squad) मोठी कारवाई केली आहे. एका बांगलादेशी नागरिकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीकडून 80 बनावट भारतीय दस्ताऐवजही जप्त करण्यात आले आहेत. अक्रम नूर नबी ओलाउद्दीन शेख (वय-28) असं अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोराचं नाव आहे. ते बांगलादेशाती नोव्हाखाली या जिल्ह्यातील रहिवाशी आहे. हेही वाचा...Pub मध्ये विना मास्क हुल्लडबाजी करत होते लोक, BMC नं अचानक टाकला छापा आरोपी अक्रम हा बांगलादेशी घुसखोर असून त्यानं बनावट भारतीय ओळखपत्रे बनवली असून तो शिवडी येथील स्मशानभूमी रोडवर येणार असल्याची गोपनिय माहिती ATSच्या काळाचौकी युनिट कार्यालयाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी घुसखोरीच्या मार्गानं भारतात आला आहे. तसेच त्याला मुंबईत सुलभ वास्तव्य करता यावे यासाठी त्यानं नुरनबी ( रा. वडाळा, मुंबई) व रफीक शेख (रा. कौसा, मुंब्रा) यांच्या मार्फत आधारकार्ड, पॅनकार्ड व भारतीय पारपत्र (Pass Port) तयार करून घेतल्याचं चौकशीत निष्पन्न झालं. अक्रम याच्यासह त्याच्या दोन साथीदाराविरुद्ध काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पासपोर्ट दलालाला अटक अक्रम शेख यास बनावट भारतीय ओळखपत्र काढून देणारा रफीर रेहमतुल्ला सय्यद (वय-42, रा. कौसा, मुंब्रा) यास अटक करून त्याची चौकशी केली असता, तो 2013 पासून पासपोर्ट दलाल म्हणून काम करत आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीनं ऑनलाईन पद्धतीनं सादर केलेल्या पासपोर्ट अर्जाची माहिती मिळवली असता सदर आरोपीनं 446 नागरिकांचे पासपोर्ट काढून दिल्याचं समजते. सदर पासपोर्ट अर्जासोबतचे दस्ताऐवज पडताळले असता त्यामध्ये भारतात घुसखोरीच्या मार्गानम प्रवेश केलेल्या एकूण 85 बांगलादेशी नागरिकांना बनावट ओळखपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंब्रा येथील कौसा भागातून 57 वर्षीय इद्रिस मोहम्मद शेख याला देखील एटीएसने अटक केली. शाळेचा बनावट दाखला, राहण्याचे प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र इद्रिस बनवायचा तर अँटॉप हिल येथून अटक केलेल्या अविन केदारे (वय- 35) हा भारतीय नागरीक इद्रिसला बनावट कागदपत्र बनवण्यासाठी बनावट शाळेचा शिक्का द्यायचा आणि नितीन निकम (वय- 43) हा बनावट बँक पासबूक आणि निवडणूक कार्ड बनविण्यात मदत करत या बांगलादेशी नागरीकांना मदत करायचा अविन केदारेला मुंबईतून तर नितिन निकमला नवी मुबंईतून अटक करण्यात आली. अक्रम खान आणि अब्दुल हसम हे दोघे बांगलादेशी असून तो भारतात चुकीच्या पद्धतीने राहत आहे, असेही तपासात समोर आले आहे. हेही वाचा...धक्कादायक, बंदी असलेल्या गर्भपात गोळ्यांची भिवंडीत खुलेआम विक्री दरम्यान,  ATSच्या अधिकाकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात यश मिळालं आहे. त्याचबरोबर बनावट कागदपत्राच्या आधारे घुसखोर बांगलादेशी नागरिकांना भारतीय ओळखपत्र मिळवून देणारं रॅकेट उघडकीस आणलं आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: ATS, Crime, Mumbai

पुढील बातम्या