पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनाम्याचे सत्र, अशोक चव्हाण यांनी दिला अध्यक्षपदाचा राजीनामा!

पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनाम्याचे सत्र, अशोक चव्हाण यांनी दिला अध्यक्षपदाचा राजीनामा!

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून मिळालेल्या मोठ्या पराभवानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

  • Share this:

मुंबई, 26 मे: लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून मिळालेल्या मोठ्या पराभवानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. संपूर्ण देशात लोकसभेत काँग्रेसला केवळ 52 जागा मिळाल्या आहेत. खुद्द काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आहे. देशातील अनेक नेते एकापाठोपाठ एक राजीनामे देत आहेत. उत्तर प्रदेशचे प्रभारी राज बब्बर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देखील राजीनामा दिला आहे. यासंदर्भातील माहिती खुद्द अशोक चव्हाण यांनीच दिली आहे.

ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अशोक चव्हाण यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मी राजीनामा पाठवला असून आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी फेरबदलासंदर्भातील निर्णय घ्यायचा आहे. यासंदर्भातील निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे. तसेच मी लवकरच राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

राजीनामा देण्याआधी अशोक चव्हाण ट्विटकरून म्हणाले होते की, राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली होती. पण काँग्रेसला राज्यात हवे तसे निकाल मिळाले नाहीत. मी महाराष्ट्रातील या पराभवाची जबाबदारी घेत राजीनामा देण्यास तयार आहे.

48 पैकी मिळाली केवळ एक जागा

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी प्रचंड खराब झाली. 2014च्या निवडणुकीत काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यात घट झाली. काँग्रेसला राज्यात फक्त एक जागा मिळाली आहे. खुद्द अशोक चव्हाण यांचा देखील पराभव झाला आहे. चंद्रपूरमधून सुरेश धनोडकर हे एकमेव काँग्रेसचे खासदार आहेत. राज्यात भाजप-शिवसेना युतीला 48 पैकी 41 जागांवर यश मिळाले आहे. अशोक चव्हाण यांनी हे देखील मान्य केली की प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या 9 ते 10 जागांचे नुकसान केले.

पराभवानंतर अशोक चव्हाण राजीनामा देण्याच्या तयारीत, पाहा UNCUT पत्रकार परिषद

First published: May 26, 2019, 11:12 AM IST

ताज्या बातम्या