आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'कृष्णकुंज'वर

आज सकाळी आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी हजेरी लावली

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2018 05:37 PM IST

आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'कृष्णकुंज'वर

मुंबई, 14 एप्रिल : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी  'कृष्णकुंज'वर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाली.

आज सकाळी आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. या दोन्ही नेत्यांमध्ये २ तास चर्चा झाल्याचं कळतंय.

आशिष शेलार यांच्या कृष्णकुंजवारीमुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय. मात्र, या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. विशेष म्हणजे अलीकडे शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात जवळकी वाढली आहे.

आशिष शेलार हे पहिल्यांदाच कृष्णकुंजवर गेले नाही. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी जेव्हा पंतप्रधान मोदींना पाठिंबा जाहीर केला होता तेव्हाही आशिष शेलार आणि विनोद तावडे यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2018 05:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...