अंधेरीत भीषण आग, 4 तासानंतरही आटोक्यात नाही

अंधेरीत भीषण आग, 4 तासानंतरही आटोक्यात नाही

  • Share this:

मुंबई, 11 सप्टेंबर : मुंबईच्या अंधेरी नागरदास रोड़वर मधुर इंडस्ट्रिअलजवळ भीषण आग लागली आहे. नागरदास रोडवरील इमारतीला ही आग लागली आहे. सगकाळी 10च्या सुमारास ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. या आगीत अद्याप कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पण दरम्यान ही आग विझवताना एक कर्मचारी जखमी झाला आहे.

आग विझवताना अग्निशमन दलाच्या कर्मचारी शेलार यांचे दोन्ही हात या आगीच भाजले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, सकाळी आगीची माहिती मिळताच सुरुवातीला अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पण आगीची तीव्रता जास्त असल्याने पाण्याचे टँकर आणि 8 गाड्या दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, आग लागलेली इमारत इंडस्ट्रिअल असल्याने यात अनेक कंपन्यांचे ऑफिस आहेत. त्यामुळे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तर एकीकडे ही इमारत काचेची असल्यामुळे आगीचे लोळ आवरण्यात अग्निशमन दलाला मोठ्या अडचणी येत आहेत. इमारतीमधला धूर बाहेर काढण्यासाठी काचा फोडाव्या लागत आहेत आणि त्याचमुळे कदाचित आग आटोक्यात आणण्यासाठी वेळ लागत आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई अग्नितांडव

- डोंबिवलीतील 'जलाराम कृपा' बिल्डिंगला आग

- मालाडमध्ये लाकडाच्या गोदामाला भीषण आग

- वसईच्या 'आमचो कोळिवाडो' या प्रसिध्द हॉटेलला लागली आग

- मुंबईतल्या परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये आग, चार जणांचा मृत्यू

-  मुंबईतील चेंबूर येथील बीपीसीएल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट

मुंबईतल्या उंच इमारती मृत्यूचा सापळा? अग्निशमन सुरक्षा वाऱ्यावर

फ्लॅस्ट्सची किंमत काही कोटींमध्ये, हाय फाय सुविधा, महिन्याला प्रचंड मेंट्नन्स, मजल्यानुसार वाढत जाणाऱ्या किंमती, डोळे दिपवणाऱ्या जाहीराती आणि एवढा पैसा खर्च करून सुरक्षेची मात्र ऐसितैसी. ही परिस्थिती आहे मुंबईतल्या उंच इमारतींची. गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबईतल्या काही अलिशान उंच इमारतींना आग लागली, त्यात काही मृत्यूही झाले मात्र या इमारतींमधल्या अग्निरोधक यंत्रणा कुचकामी ठरल्याचं भीषण वास्तव समोर आलं असून या इमारती म्हणजे मृत्यूच्या सापळा ठरणार आहेत का असा सवाल आला रहिवाशी विचारत आहेत.

कमला मिल रेस्टॉरंट, अलिशान ब्ल्यू माँड आणि आज लागलेल्या क्रिस्टल टॉवरच्या आगीत हे भीषण वास्तव पुढे आलं आहे. कोट्यवधी रूपये खर्च करून या इमारती बांधल्या जातात मात्र त्यात अग्निसुरक्षेची काहीही काळजी घेतली जात नाही. त्यामुळे मुंबईकर कोणत्याही बाबतीत सुरक्षित नाही हेच खरं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2018 01:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading