मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा,बुधवारी शाळा-काॅलेजला सुट्टी

बुधवारी 20 सप्टेंबरला वेधशाळेनं मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. खबरदारी म्हणून प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलीये.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2017 11:59 PM IST

मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा,बुधवारी शाळा-काॅलेजला सुट्टी

19 सप्टेंबर :  मुंबई आणि उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बुधवारी 20 सप्टेंबरला वेधशाळेनं मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. खबरदारी म्हणून प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलीये.

मुंबईसह उपनगरात मंगळवारी दुपारपासून धुवाँधार पावसाने जोरदार हजेरी लावलीये. मुंबईतील सायन, दादर, परळ, फोर्ट भागांमध्ये जोरदार पाऊस रात्रीपर्यंत सुरू होता. पुढील 24 तास अशाच मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.

तर दुसरीकडे मुंबईची लाईफलाईन मात्र सुरळीत आहे. रात्री सायन स्टेशनवर रुळावर पाणी साचलं पण लोकल धीम्या गतीने सुरूच आहे.

मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झालीय. जोगेश्वरी विक्रोऴी लिंक रोड, सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड, एसव्ही रोड, एलबीएस रोड या मुख्य मार्गांवर मोठी कोंडी झालीये.

मुसळधार पावसाचा मुंबई एअरपोर्टला देखील फटका बसला. मुंबईतील विमान सेवा काही वेळेसाठी ठप्प झालीये.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2017 11:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...