मुंबई

  • Associate Partner
  • diwali-2020
  • diwali-2020
  • diwali-2020

मुंबई-पुण्यात दिवाळी सणाबाबत नियमावली, नागरिकांना 'या' गोष्टी लक्षात ठेवाव्याच लागतील!

मुंबई-पुण्यात दिवाळी सणाबाबत नियमावली, नागरिकांना 'या' गोष्टी लक्षात ठेवाव्याच लागतील!

मुंबई आणि पुणे मनपानेही दिवाळीबाबत नियमावली जारी केली आहे.

  • Share this:

मुंबई, 9 नोव्हेंबर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सन साजरा करताना अनेक महापालिकांकडून निर्बंध घालण्यात येत आहेत. मुंबई आणि पुणे मनपानेही दिवाळीबाबत नियमावली जारी केली आहे.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फुलझडी, अनार यासारखे मर्यादित स्वरूपात फटाके फोडण्यास राज्य शासन व मुंबई महापालिका प्रशासनाने परवानगी दिली असून कोरोनाचे संकट लक्षात घेता मुंबईकर नागरिकांनी महापालिका प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.

महापौर किशोरी पेडणेकर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, मुंबईकरांच्या काळजीपोटी प्रमुख रुग्णालयातील भाजलेले वॉर्ड सुसज्ज ठेवावे, जेणेकरून लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत उपचार करता येणे शक्य होईल. दिपावलीच्या काळामध्ये ध्वनी व वायू प्रदूषणामुळे कोरोना संक्रमितांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यासाठी बंदी घालण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले.

25 ऑक्टोंबर 2016 च्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आवाजाचे व हवेत उडणारे फटाक्यांवर बंदी घालण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले. रहिवाशी क्षेत्रातील फटाके दुकानदार नियमांचे उल्लंघन करीत असेल तर त्यांच्या दुकानांची तपासणी करण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळतांना दृकश्राव्य प्रणालीद्वारे ओवाळणी करावी असे आवाहनही महापौरांनी यानिमित्ताने केले आहे.

पुण्यात काय असतील नियम?

दिवाळीसाठी पुणे महापालिकेनेही नियमावली जारी केली आहे. पालिकेच्या मालकीच्या जागांत -शाळा,उद्याने ,मैदाने,पर्यटन स्थळे या ठिकाणी फटाके वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसंच खाजगी जागी कमी धुराचे फटाके वाजवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कोरोना स्थिती लक्षात घेऊन मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आणि सॅनिटायजर न वापरता फटाके वाजवण्याची सूचना करण्यात आली आहे. यंदा सांस्कृतिक कार्यक्रम-दिवाळी पहाट आयोजित करण्यास मनाई करण्यात आली असून हे कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने साजरे करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: November 9, 2020, 10:02 PM IST

ताज्या बातम्या