इथे कोरोना वाढला आणि तिथे मुंबई-पुण्यातून बिहारसाठी विशेष ट्रेन्स सुरू

इथे कोरोना वाढला आणि तिथे मुंबई-पुण्यातून बिहारसाठी विशेष ट्रेन्स सुरू

पुन्हा एकदा श्रमजीवींचे लोंढे आपापल्या गावी जायला लागल्याचं चित्र आहे. मुंबईत वास्तव्य करणारे बिहारमधील लोक आता यामुळे पुन्हा आपल्या मूळगावी परतण्याच्या तयारीला लागले आहेत.

  • Share this:

मुंबई, 7 एप्रिल: कोरोनाचा (Coronavirus mumbai) संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. महाराष्ट्राचा विचार करता,सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढताना दिसत आहे. मुंबईत देखील कोरोना संसर्गाची स्थिती चिंताजनक असून, पुन्हा एकदा श्रमजीवींचे लोंढे आपापल्या गावी जायला लागल्याचं चित्र आहे. मुंबईत वास्तव्य करणारे बिहारमधील लोक आता यामुळे पुन्हा आपल्या मूळगावी परतण्याच्या तयारीला लागले आहेत. या स्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने (Indian Rail)मुंबई आणि पुणे येथून स्पेशल ट्रेन (Special Trains)सोडण्यास सुरुवात केली आहे.

प्रवाशांच्या सोयीकरिता भारतीय रेल्वेने मुंबई ते पाटणा (Patna)आणि दरभंगा (Darbhanga)तसेच पुणे ते दानापूर (Danapur)या मार्गावर जादा स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या प्रवाश्यांनी आगाऊ आरक्षण घेतले आहे,अशाच प्रवाश्यांना या ट्रेन्सने प्रवास करता येणार आहे.

असे आहे ट्रेन्सचे वेळापत्रक

-01401:सुपरफास्ट विशेष ट्रेन पुण्याहून 9,11,16 आणि 18 एप्रिललादुपारी4:15 वाजता सुटेल. ही ट्रेन दानापूरला दुसऱ्या दिवशीरात्री 11:45 वाजता पोहोचेल

-01402:विशेष ट्रेन दानापुरहून 11,13,18 व 20 एप्रिललादुपारी04:00 वाजता सुटेल. ही ट्रेन पुण्यात दुसऱ्या दिवशीदुपारी12:05 वाजता पोहोचेल.

एकीकडे लसीकरण बंद, दुसरीकडे उपचारांसाठी ICU बेडही नाहीत; मुंबईत भयंकर परिस्थिती

-01091 सुपरफास्ट ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,मुंबई येथून 12,15 व 19 एप्रिललासकाळी11:05 वाजता सुटेल. ही ट्रेन दुसऱ्या दिवशीदुपारी2:30 वाजता पाटण्याला पोहोचेल.

-01092:विशेष ट्रेन पाटण्याहून 13,16 आणि 20 एप्रिललादुपारी 4:20 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशीरात्री11:30 वाजता ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल.

-01097:सुपरफास्ट विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस,मुंबई येथून 12 आणि 19 एप्रिललासकाळी08:05 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशीदुपारी 4:10 वाजता दरभंगा येथे पोहचेल.

maharashtra corona update : राज्यात रुग्णांची संख्या 60 हजारांजवळ!

- 01098:सुपरफास्ट विशेष ट्रेन दरभंगा येथून 13 आणि 20 एप्रिललासंध्याकाळी 5:20 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशीपहाटे05:10 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस,मुंबईला पोहोचेल.

बिहार सरकारने सुरू केली तयारी

मुंबईत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावला आहे. त्यामुळे या ट्रेन्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोक महाराष्ट्रातून बिहारला जात आहेत. या अनुषंगाने राज्य सरकारने तयारी सुरु केली आहे. मंगळवारीबिहारचेमुख्यमंत्री नितीश कुमार यांनीडीएम आणि एसपींसोबत बैठक घेत प्रत्येक विभागात क्वारंटाईन सेंटर्स (Quarantine Centers)सुरू करण्याच्या सूचना दिल्या. मुंबईतून बिहार मध्ये येणाऱ्या प्रवाश्यांना या सेंटर्समध्ये ठेवण्याबाबतही त्यांनी सूचित केले. या सर्व घडामोडी पाहता सरकार पुन्हा अॅलर्ट मोडवर आल्याचे दिसून येते.

First published: April 7, 2021, 11:50 PM IST

ताज्या बातम्या