विदर्भ आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात 7-8 ऑगस्टला मुसळधार पावसाचा अंदाज

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील विदर्भ आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात उद्या, 7 आणि परवा 8 ऑगस्टला मुसळधार पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. पावसासह तापमानातही घट होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 06:14 PM IST

विदर्भ आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात 7-8 ऑगस्टला मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई, 6 ऑगस्ट- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील विदर्भ आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात उद्या, 7 आणि परवा 8 ऑगस्टला मुसळधार पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. पावसासह तापमानातही घट होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

7 तारखेला पूर्व-विदर्भातील काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस होईल. उर्वरित विदर्भात हलका पाऊस राहील. परंतु 8 तारखेला विदर्भातील बऱ्याच भागात मध्यम ते जोरदार पाऊस होईल. ज्यामुळे नदी, नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढणार..

मुंबईसह उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत येत्या 8 आणि 9 ऑगस्टला पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज देखील हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

विदर्भात 9 ऑगस्टपासून तर मध्य-महाराष्ट्रात 10 ऑगस्टपासून हवामानाची स्थिती सामान्य राहील. यादरम्यान पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असून विदर्भ आणि मध्य-महाराष्ट्रातील लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

Loading...

पुण्यात हाहाकार... अनेक संसार उघड्यावर

पुण्यात मागील आठवड्याभरापासून पाऊस सुरू आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका पिंपरी-चिंचवडकरांना बसला आहे. शहरातून वाहणाऱ्या तीनही नद्यांना पूर आल्याने एकच हाहाकार उडाला आहे. आतापर्यंत तब्बल 6000 नागरिकांना स्थलांतरित करावे लागले आहे. पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या तीनही नद्यांना आलेल्या पुराने शहराला अक्षरशः वेढा घातला आहे. शहरातील अनेक रस्ते, सोसायटी, घरे, मंदिरे झोपड्या, दवाखाने आणि मोठे प्रकल्प जलमय झाले आहेत. तब्बल 6000 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. पुरग्रस्तांना मदत करण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

भयंकर! पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने क्षणांत सारा रस्ता वाहून नेला; भूस्खलनाचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 06:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...