...अन् वृद्धाने गिळली कवळी !

डॉक्टरांनी ही शस्त्रक्रीया यशस्वी करुन सहा सेंटीमिटर लांबीची कवळी बाहेर काढली.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 29, 2018 08:55 PM IST

...अन् वृद्धाने गिळली कवळी !

 

मुंबई, 29 मे : आपण कृत्रिम दात लावले असतील तर सावध रहा...कारण कृत्रिम दात निघून ते अन्ननलिकेत अडकून जीवाला धोका निर्माण झाल्याची घटना घडलीये.

मुंबईतील कुर्ल्यात 65 वर्षीय अब्दुल गणी अहमद खान यांच्या नकळत त्यांचा कृत्रिम दात असलेली कवळी गिळली गेली. पण डॉक्टरांनी अथक प्रयत्नांनी शस्त्रक्रिया करून कवळी काढली आणि गणी यांना जीवदान दिलं.

65 वर्षीच्या अब्दुल गणी यांचा एक दात पडला म्हणून त्यांनी त्या जागेवर एक कृत्रिम दात असलेली कवळी लावली. रोज रात्री ही कवळी काढून सकाळी लावतात. त्यांनी ही कवळी लावल्यानंतर नाश्ता करताना ही कवळी त्यांच्याकडून नकळत गिळली गेली.

ही कवळी अन्ननलिकेत अडकली होती. शस्त्रक्रिया करताना या रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता पण धोका पत्कारून डॉक्टरांनी ही शस्त्रक्रीया यशस्वी करुन सहा सेंटीमिटर लांबीची कवळी बाहेर काढली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 29, 2018 08:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...