मुलाच्या लग्नाआधी मुकेश अंबानी यांनी मुंबई पोलिसांना दिले 'हे' गिफ्ट

मुलाच्या लग्नाआधी मुकेश अंबानी यांनी मुंबई पोलिसांना दिले 'हे' गिफ्ट

  • Share this:

मुंबई, 08 मार्च: उद्योगपती मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांच्या मोठा मुलगा आकाश अंबानी याचा विवाह रसल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता हिच्याशी होणार आहे. लग्नाच्या आधी मुकेश अंबानी यांनी मुंबईत तैनात असलेल्या तब्बल 50 हजार पोलिस कर्मचाऱ्यांना मिठाई पाठवली आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रिलायन्सकडून मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात मिठाईचे डब्बे पाठवण्यात आले आहेत. आकाश आणि श्लोका यांचा विवाह ९ मार्च रोजी होणार आहे. मिठाई सोबत मुकेश अंबानी, पत्नी निता आणि मुलांच्या नावाने एक कार्ड देखील पाठवण्यात आले आहे.

बुधवारी अंबानी आणि मेहता कुटुंबियांनी मुलांना जेवण दिले होते. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अन्न सेवा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर अंबानी कुटुंबीयांनी धीरुभाई अंबानी स्केअरचे उद्घाटन केले होते. या कार्यक्रमात मुलांनी म्यूजिकल फाऊंटनचा आनंद घेतला होता.

आकाश आणि श्लोका यांचा मेहंदी कार्यक्रम नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियामध्ये झाला होता. येत्या 9 मार्च रोजी बांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये त्यांचा विवाह होणार आहे. 9 मार्च रोजी दुपारी 3.30 मिनिटांनी ट्रि्डेंट हॉटेल येथून वरात निघणार आहे. त्यानंतर 11 मार्च रोजी स्वागत समारंभ होणार आहे. या कार्यक्रमासाठी शाहरुख खान, आमिर खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, करण जोहर, अयान मुखर्जी, मलायका अरोरा, करिश्मा कपूर यासह अनेक स्टार उपस्थित राहणार आहेत.

VIDEO: क्लासमध्ये विद्यार्थीनीची काढली छेड; शिक्षकाला असा दिला चपला, बुटांचा आहेर

First published: March 8, 2019, 4:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading