Home /News /mumbai /

विमानतळाच्या नावाचा वाद लवकरच संपेल, आदित्य ठाकरेंना विश्वास

विमानतळाच्या नावाचा वाद लवकरच संपेल, आदित्य ठाकरेंना विश्वास

मुंबईतील (Mumbai) अदानी कंपनीकडे (Adani) असणाऱ्या विमानतळाच्या (Airport) नावावरून सुरु असलेला वाद (Renaming issue) लवकरच संपेल, असं मत मुंबई उपनगर जिल्हा पालक मंत्री आदित्य ठाकरेंनी (Aditya Thakray) व्यक्त केलं आहे.

    मुंबई, 2 ऑगस्ट : मुंबईतील (Mumbai) अदानी कंपनीकडे (Adani) असणाऱ्या विमानतळाच्या (Airport) नावावरून सुरु असलेला वाद (Renaming issue) लवकरच संपेल, असं मत मुंबई उपनगर जिल्हा पालक मंत्री आदित्य ठाकरेंनी (Aditya Thakray) व्यक्त केलं आहे. मुंबई विमानतळाचं नाव कुणीच बदलू शकत नाही, असंही ते म्हणाले. मुंबई विमानतळाचे नाव बदलणे योग्यही ठरणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं. आदिवासी पाड्यांमध्ये लसीकरण गेल्या आठवड्यात आदिवासी पाड्यांमध्ये गेल्यानंतर तिथं लसीकरणाचं प्रमाण कमी असल्याचं आपल्याला कळलं. त्यानंतर तिथे लसीकऱण मोहिम सुरू केल्याची माहिती त्यांनी केली. पाड्यापाड्यावर जाऊन आपण लसीकरण करणार आहोत, अशी घोषणा त्यांनी केली आहे. आदिवासींमधील लसीकरणाला वेग शहरांमध्ये लसींचा पुरवठा गेल्या काही महिन्यांपासून कमी आहे. मात्र त्याची जाणीव सरकारला असून केंद्र सरकारकडे सातत्यानं लसींसाठी पाठपुरावा केला जातो. मात्र आदिवासी पाड्यांमध्ये मुळातच हे प्रमाण कमी असून त्याबद्दल कुणीच आवाज उठवत नसल्यामुळे दुर्लक्षित राहिलेल्या या प्रश्नात आपण लक्ष घालून ही मोहीम पूर्ण करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. हे वाचा -धक्कादायक! महाराष्ट्रात चार तासात अल्पवयीन मुलीवर सहा जणांकडून गँगरेप मुंबईतील लसीकरण वेगाने मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वेगाने लसीकरण सुरु असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. लसींच्या उपलब्धतेचा मुद्दा सोडला, तर मुंबईतील लसीकऱणाचे नियोजन उत्तम असून आतापर्यत मुंबईत 90 लाखांपेक्षा अधिक डोस देण्यात आले आल्याचं ते म्हणाले. यापैकी 65 लाख लोकांना एक डोस मिळाला असून 10 ते 12 लाख जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस मिळाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Aaditya thackeray, Airport, Corona vaccination

    पुढील बातम्या