Home /News /mumbai /

मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्याचा उधळला डाव; अंतर्वस्त्रात लपवले होते 60 हजार डॉलर

मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्याचा उधळला डाव; अंतर्वस्त्रात लपवले होते 60 हजार डॉलर

Crime in Mumbai: मुंबई विमानतळावर (Mumbai airport) ग्राउंड हँडलिंगचं काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने 60 हजार डॉलर अंतर्वस्त्रात लपवून (hide 60000 doller in inner wear) आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

    मुंबई, 22 जानेवारी: मुंबई विमानतळावर (Mumbai airport) ग्राउंड हँडलिंगचं काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने 60 हजार डॉलर अंतर्वस्त्रात लपवून (hide 60000 doller in inner wear) आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित कर्मचारी ही रक्कम दुबईला जाणाऱ्या एका प्रवाशाला देणार होता. पण विमानतळावरील सुरक्षा दलाने त्याचा हा डाव उधळून लावला आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर संशय येताच सीआयएसएफच्या जवानांनी त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली आहे. यावेळी या कर्मचाऱ्याच्या अंतर्वस्त्रात 60 हजार डॉलरची रक्कम आढळली आहे. शुक्रवारी पहाटे टर्मिनल दोनवर हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (CISF)मुंबई विमानतळावरील ग्राउंड हँडलिंग एजन्सीच्या कर्मचाऱ्यांची तपासणी केली जात होती. यावेळी एका कर्मचाऱ्याच्या हालचाली संशयास्पद दिसल्या. हेही वाचा- Mumbai Fire: मुंबईतील कमला इमारतीत अग्नितांडव, 6 जणांचा होरपळून मृत्यू तर 15 जखमी त्यामुळे सीआयएसएफच्या जवानांनी संबंधित कर्मचाऱ्याला बाजूला घेऊन त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्या अंतर्वस्त्रात आणि पायमोजांमध्ये परकीय चलन लपवल्याचं समोर आलं आहे. ही रक्कम तब्बल 60 हजार डॉलर एवढी असल्याचं समोर आलं आहे. आरोपी कर्मचारी ही रक्कम दुबईला जाणाऱ्या एका प्रवाशाला देणार होता. पण त्याचा सीआयएसएफच्या जवानांनी त्याचा डाव उधळून लावला आहे. जवानांनी सर्व रक्कम जप्त केली असून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Mumbai

    पुढील बातम्या