मुंबई, 20 सप्टेंबर: मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस पडतो आहे. यामुळे मुंबईची विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईवरून जाणाऱ्या 56 विमानांचे मार्ग बदलले आहेत.
नागपूर विमानतळावरील अडकलेल्या प्रवाशांची एअर इंडियाने सरतेशेवटी व्यवस्था केली . १८० आसन क्षमतेच्या विमानात काल आलेल्या सर्व प्रवाशांना तिकिटं दिली. सर्व प्रवाशी मुंबईकडे रवाना झाले. हा प्रवाशांच्या संघर्षाचा विजय आहे. एअर इंडियाचे AI 630 विमान मुंबई विमानतळावरून आले होते ११ .२० ला परत. तेव्हापासून प्रवाशी विमानतळावरच ताटकाळत होते.
तर दुसरीकडे मुंबईला येणारी काही विमान हैद्राबाद , अहमदाबादकडे वळवण्यात आली आहेत. तर अनेक विमान रद्द करण्यात आली आहेत. तर काही विमानं उशिराने सुरू आहे.
एकंदर मुंबईची विमान वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.
#MumbaiRains #UPDATE: Main runway of Mumbai airport still closed; total 56 flights have been diverted. Second runway operating
— ANI (@ANI) September 20, 2017
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा