मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी, मुंबईकडे येणारी वाहतूक खोळंबली

मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी, मुंबईकडे येणारी वाहतूक खोळंबली

मुंबई अहमदाबाद महामार्गावर (Mumbai-Ahmedabad highway) वाहतुकीची कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूक मंदावली आहे.

वसई, 04 जून: मुंबई अहमदाबाद महामार्गावर (Mumbai-Ahmedabad highway) वाहतुकीची कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूक मंदावली आहे. गेल्या दोन तासांपासून ही ट्रॅफिक जाम (Traffic jam )झालं आहे. मालजी पाडा येथे ओव्हर ब्रिजचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक मंदावली असून अर्ध्या तासात वाहतूक सुरळीत होणार असल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी सांगितले आहे.

मुंबई-अहमदाबाद मार्गावर मालजी पाडा येथे ओव्हर ब्रिज चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. महामार्गावरील चार लेनची एकच लेन झाली आहे. दरम्यान पहाटेच्या सुमारास या महामार्गावरून कंटेनर जात असतात. त्यात एकच लेन असल्यानं एकावेळी एकच कंटेनर जाऊ शकतो. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असल्याची समस्या आता उद्भवू लागली आहे.

महामार्गावर आज पहाटे पासून कंटेनरची संख्या जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे मंदावली होती त्यामुळे विरुद्ध दिशेने अनेकांनी वाहने फिरवल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला काहींनी घरी जाणे पसंत केले. दरम्यान वाहतूक पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी अर्ध्या तासात वाहतूक पूर्वपदावर येईल असे सांगण्यात आले आहे.

First published:
top videos