सख्ख्या भावांच्या गाडीला मुंबईजवळ भीषण अपघात, 24 वर्षीय तरुणाच्या डोळ्यासमोरच लहान भावाने सोडला जीव

सख्ख्या भावांच्या गाडीला मुंबईजवळ भीषण अपघात, 24 वर्षीय तरुणाच्या डोळ्यासमोरच लहान भावाने सोडला जीव

या अपघातात 22 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक 24 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे.

  • Share this:

मीरारोड, 24 ऑगस्ट : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बाईकने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 22 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक 24 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. सुरज सुनील हरणे असं मृत तरुणाचा नाव आहे. तर सागर सुनील हरणे हा जखमी झाला आहे.

कशिद कोपरवरून सातिवली येथे कामावर जात असताना पेल्हार या ठिकाणी ट्रक मधोमध उभा होता. त्याला मोटारसायकलने जोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की 22 वर्षीय सुरजचा जागीच मृत्यू झाला आणि 24 वर्षीय सागर सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. त्याला मिरारोड येथे उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

महामार्गावरील पेल्हार येथे पहिल्या लेनवर बंद ट्रक दुरुस्तीसाठी उभा होता. यावेळी भरवेगात आलेल्या दुचाकीस्वारांनी ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. या भीषण अपघात बाईकचा अक्षरशः भुगा झाला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवून अपघातात वाचलेल्या जखमीला उपचारासाठी हलवले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गाडी चालवताना वेगावर नियंत्रण नसणं हे या अपघातांचं प्रमुख कारण ठरत आहे. अपघातग्रस्तांमध्ये विशेषत: तरुणांचा आकडा मोठा आहे. त्यामुळे असे अपघात टाळायचे असतील आणि पर्यायाने आपला जीव वाचवायचा असेल तर वाहन चालवताना शिस्त दाखवावीच लागेल, असं आवाहन केलं जात आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 24, 2020, 4:14 PM IST

ताज्या बातम्या