02 डिसेंबर : एअर इंडियाचं मुंबईहून अहमदाबादला जाणारं विमान रात्री तब्बल सात तास लेट झाल्यानं प्रवाशांनी सकाळी विमानतळावर गोंधळ घातला. यावेळी प्रवाशांनी दरवाजावर ठाण मांडून बसत विमानतळावर प्रवाशांची ये-जा काही काळ रोखून धरली.
रात्री साडेबारा वाजताचं विमान सकाळी सातपर्यंत आलंच नाही आणि एअर इंडिया प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची माहितीही देण्यात येत नव्हती. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला. वैमानिक नसल्यामुळे विमान उड्डाणाला उशीर झाल्याचं सूत्रांकडून कळतंय.
अखेर सकाळी साडे आठ वाजता विमान उडालं आणि नियोजित वेळेपेक्षा सात तास उशिरा अहमदाबादला पोहचलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा