VIDEO मुंबईतल्या MIDCत लागलेली आग भडकली, सर्व इमारतीनेच घेतला पेट

VIDEO मुंबईतल्या MIDCत लागलेली आग भडकली, सर्व इमारतीनेच घेतला पेट

आग ही सर्व्हर रुमला लागली असल्यामुळे ती झपाट्याने पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवान जास्त काळजी घेत आहेत.

  • Share this:

मुंबई 13 फेब्रुवारी : मुंबईतल्या वर्दळीच्या अंधेरीतल्या MIDCमध्ये एका कंपनीला भीषण आग लागलीय. इथे असणाऱ्या रोल्टा या कंपनीच्या इमारतीला ही आग लागलीय. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. इथल्या सर्व्हर रुमला ही आग लागलीय. level 4 ची ही आग असल्याचं फायरब्रिगेडने सांगितलंय. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु असून फायर ब्रिगेडच्या 30 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. इमारतीतल्या सगळ्यांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आलं असून मध्ये कोणी अडकून राहिलेलं नाही याचीही खात्री अधिकारी करत आहेत. आगीचा धूर सर्व इमारतीत पसरला असून जावांना आगीवर नियंत्रण मिळवताना अडचणींचा सामना करावा लागतोय.

सुरुवातीला आग नियंत्रणात येत असतानाच हवेमुळे आग पुन्हा भडकली आणि पाहाता सर्व इमारतच आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आजुबाजूच्या इमारतीतल्या कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढण्यात आलंय.

आग ही सर्व्हर रुमला लागली असल्यामुळे ती झपाट्याने पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवान जास्त काळजी घेत आहेत. सर्व इमारतीत असलेले प्लायवूड आणि इलेक्ट्रॉनिक सामानामुळे ही आग भडकत आहे. काच आणि फायबरचा वापर करून इमारत बांधण्यात आल्याने आग पसरत आहे. फायर ब्रिगेडच्या आणखी गाड्या बोलावण्यात आल्या आहेत.

First published: February 13, 2020, 1:32 PM IST

ताज्या बातम्या