मुंबई: MTNLच्या इमारतीतील अग्नितांडव, जवळपास सर्वांना सुखरुप बाहेर काढलं!

मुंबई: MTNLच्या इमारतीतील अग्नितांडव, जवळपास सर्वांना सुखरुप बाहेर काढलं!

वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या 31 गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 22 जुलै: वांद्रे येथील MTNLच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीतून सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या बचावकार्यात 2 जवान किरकोळ जखमी झाले आहेत. जवानांनी जवळपास 90 जणांना इमारतीतून बाहेर काढले आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार अद्याप कोणीही बेपत्ता असल्याचे नाही.

वांद्रे पश्चिम येथील एन.व्ही.रोडवर असलेल्या एमटीएनएलच्या इमारतीला दुपारी 4च्या सुमारास आग लागली. ही आग लेव्हर चारची होती. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या 31 गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. इमारतीत 100 जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अग्निशमन दलाने तातडीने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास आणि आग विझवण्यास सुरुवात केली. MTNLच्या इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली होती. आग लागल्यानंतर अनेकांनी गच्चीकडे धाव घेतली त्यांना क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

काही दिवसांपूर्वी मुंबई अग्निशमन दलात दाखल झालेल्या रोबो व्हॅन देखील यावेळी जवानांच्या मदतीला होती.

या इमारतीचे 2018मध्ये फायर ऑडिट झाले होते.

VIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण

First published: July 22, 2019, 4:35 PM IST
Tags: mumbai

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading