मुंबईत आदित्य आर्केड बिल्डिंगला भीषण आग, एकाचा मृत्यू तर दोन फायरमन जखमी

मुंबईत आदित्य आर्केड बिल्डिंगला भीषण आग, एकाचा मृत्यू तर दोन फायरमन जखमी

8 ते 10 जणांना जवानांनी क्रेन आणि शिडीच्या मदतीने इमारतीत अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढले...

  • Share this:

मुंबई,13 ऑक्टोबर: मुंबईतील ग्रॅंट रोडच्या ड्रीमलँड सिनेमाजवळील 6 मजली आदित्य आर्केड बिल्डिंगला भीषण आग लागली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोन फायरमन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नायर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. तसेच धुरात एकूण तिघे जण गुदमरले. त्यातील एक जण जखमी झाला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रविवारी सकाळी सहा वाजता आदित्य आर्केड बिल्डिंगमध्ये आग भडकली. लोकांनी खिडक्यांना लावलेल्या लोखंडी जाळ्या आग विझवण्यात अडथळा ठरत आहेत. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि पाण्याचे सहा टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 8 ते 10 जणांना जवानांनी क्रेन आणि शिडीच्या मदतीने इमारतीत अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढले. प्रचंड धूर झाल्याने आग विझवण्यात अग्निशमन दलाला अडचणी आल्या. मोठी करसत करून जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एक व्यक्ती बेपत्ता झाली होती. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. या मजल्यावरून धुराचे लोट बाहेर पडत होते. याशिवाय मजल्यावर आगीमुळे कमालीची उष्णता होती. अग्निशमन कर्मचारी कृत्रिम श्वसन यंत्रणेच्या मदतीने मजल्यावर प्रवेश केला. ती व्यक्ती चौथ्या मजल्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली. त्या व्यक्तीला जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दरम्यान, आगीमुळं सगळीकडं धूर पसरला होता.

तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर भडकली आग

दरम्यान, 22 जुलै रोजी मुंबईतील एक नऊ मजली बिल्डिंगला आग लागली होती. ही बिल्डिंग एमटीएनएल एक्सचेंज आहे. तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर भीषण आग भडकली होती. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या 31 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. साडे तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश मिळाले होते. आगीत अडकलेल्या 84 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. या ऑपरेशनमध्ये अग्निशमन दलाचा जवान जखमी झाला होता.

VIDEO:पंकजा मुंडेंच्या सभेदरम्यान गोंधळ; घोषणाबाजी करणारे आंदोलक ताब्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: grant road
First Published: Oct 13, 2019 05:14 PM IST

ताज्या बातम्या