मुंबई, 01 जुलै : मुंबईतील उच्चभ्रू असलेल्या पवईतील हिरानंदानीमध्ये एका इमारतीला भीषण आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुंबईतील पवई परिसरात हिरानंदानीमध्ये डेल्फी नावाच्या इमारतीत सकाळी 6 च्या सुमारास आग लागली होती. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर एका कार्यालयामध्ये ही आग लागली होती. 5 व्या मजल्यावर आग लागली आणि काही क्षणात आगीने रौद्ररुपधारण केले. त्यामुळे 5 आणि 6 व्या माळ्यावर धूर कोंडला होता.
मुंबईतील पवई परिसरात हिरानंदानीमध्ये इमारतीला आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल pic.twitter.com/WiURSMHoZn
या इमारतीला आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. आगीची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. या इमारतीला आग नेमकी कशामुळे लागलीच याचा तपास सुरू आहे.