धक्कादायक! कपडे बदलताना तरुणींचे काढायचा VIDEO, मुंबईत लेडीज टेलरला अटक

धक्कादायक! कपडे बदलताना तरुणींचे काढायचा VIDEO, मुंबईत लेडीज टेलरला अटक

मुंबईत ट्रायल रुममध्ये छुपा कॅमेरा लपवणाऱ्या टेलरचं बिंग फुटलं

  • Share this:

मुंबई, 12 फेब्रुवारी: ट्रायल रुममध्ये छुप्या कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरीतील लोखंडवाल परिसरात समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सध्या ताब्यात असलेल्या टेलरची चौकशी सुरू आहे. एका तरुणीच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. टेलरने आपल्या दुकानाच्या ट्रायल रुममध्ये छुप्या पद्धतीनं कॅमेरा ठेवला होता. त्यामध्ये मुलींचे कपडे बदलताना व्हिडिओ चित्रीकरण केले जात होते. एका तरुणीच्या धाडसामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

धाडसी तरुणीनं प्रकरण कसं आणलं उघडकीस

अंधेरीतील लोखंडवाला परिसरात एका मैत्रिणीच्या ओळखीमध्ये तरुणीनं कपडे शिवण्यासाठी दिले होते. ते कपडे घेऊन येण्यासाठी टेलरकडे गेली. त्यावेळी टेलरने कपडे होत आहेत की नाही हे चेक करून पाहण्यासाठी ट्रायल रुम वापरण्यास सांगितली. तरुणीने कपडे ट्राय करून पाहिले. मात्र सहज तिचं लक्ष समोर असलेल्या पिशवीकडे गेलं. त्यावेळी तिला मोठा धक्का बसला. तरुणीनं पिशवी उघडली त्यावेळी त्यामध्ये कॅमेरा होता. तिथे उघडून पाहिल्यानंतर तिच्या संपूर्ण प्रकार लक्षात आला. तरुणीनं कॅमेरा घेऊन टेलरला जाब विचारला. त्यावर टेलरने अरेरावीची भाषा केली. तरुणीनं तातडीनं तिच्या मैत्रीणीसह कुटुंबियांना घटनेची माहिती दिली आणि टेलरला पोलिसांच्या हवाली केलं. तरुणीच्या धाडसामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून टेलरची कसून चौकशी सुरू आहे.

हेही वाचा-याला म्हणतात जुगाड! होळीसाठी चक्क पाण्याच्या टॅंकरमधून आणली दारू

हेही वाचा-आईच्या डोळ्यासमोर 3 महिन्याच्या बाळाचा अपघात, हृदयाचे ठोके चुकवणारा VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2020 08:46 AM IST

ताज्या बातम्या