14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या

14 वर्षाच्या मुलापासून ते शिवसेना नेत्याच्या भाच्यापर्यंत, मुंबईत 11 दिवसात 8 हत्या

मुंबईमध्ये सध्या गुन्हेगारीचं सत्र वाढत आहे. गेल्या 11 दिवसांमध्ये मुंबईच्या कल्याण, भिवंडी आणि उल्हासनगर परिसात तब्बल 8 हत्या झाल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 13 नोव्हेंबर : मुंबईमध्ये सध्या गुन्हेगारीचं सत्र वाढत आहे. गेल्या 11 दिवसांमध्ये मुंबईच्या कल्याण, भिवंडी आणि उल्हासनगर परिसात तब्बल 8 हत्या झाल्या आहेत. शहरातील शांतीनगर पिराणीपाड्यातील जागेबाबत सुरू असलेल्या वादातून अमजदिया हायस्कुलच्या बाजूला गुलाम रसुल दवाखान्याजवळ एकाची हत्या करण्यात आली.

ही हत्या त्याच्या पत्नीसमोर केल्याने परिसरांत दहशत निर्माण झाली असून या घटनेच्या वेळी परिसरांतील लोकांनी हल्लेखोरांतील एकास पकडून पोलीसांच्या ताब्यात दिलं.

मोहम्मद आवेश उर्फ राजू अन्सारी (32)असे मयत युवकाचे नांव असून तो पिराणीपाडा रहेमते मदिना मशीदजवळ आपल्या कुटूंबासह रहात होता. तो  रविवार रोजी सायंकाळी सव्वासहा वाजता दुचाकीवरून पत्नी कुलसुम आणि मुलासह भाजी आणण्याकरता मार्केटकडे जात होता.

तेव्हा त्याच्या मागून अफरोज बिलाल अन्सारी हा रिक्षातून त्यांचा पाठलाग करत आला. मोहम्मद आवेशची दुचाकी अमजदीया हायस्कुलच्या बाजूला आली असता त्याने रिक्षाने मागून धक्का मारून दुचाकीवर बसलेल्या तिघांना खाली पाडलं.

त्याचवेळी रिक्षातून बाहेर येऊन अफरोज याने शिवीगाळी करीत हातातील चाकूने धमकावीत आवेश उर्फ राजू अन्सारी याच्या छातीवर, पोटावर, हातावर आणि पायावर वार केले. त्याचवेळी तेथे अफरोजचा भाऊ फिरोज बिलाल अन्सारी याने तेथे मदतीकरीता जमलेल्या लोकांना 'कोई बिचमें नही आना'अशी धमकी देत मदतीपासून परावृत्त केले.

या घटनेनंतर जखमी आवेश याना इंदिरा गांधी स्मृती रूग्णालयात उपचारास आणले असता तेथील डॉक्टरांनी आवेश मृत झाल्याचे घोषित केलं. तर घटनास्थळी जमलेल्या लोकांनी फिरोजला पकडून पोलीसांच्या ताब्यात दिलं.

मृत मोहम्मद आवेश अन्सारीच्या जागेवर फिरोज आणि अफरोज हे दोघे भाऊ अतिक्रमण करून बांधकाम करीत असल्यामुळे त्यांच्यामध्ये वाद होते. त्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलीसांनी दिली. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अफरोज आणि फिरोज बिलाल अन्सारी या दोघा भावांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असुन फिरोज यांस अटक केली आहे.

या घटनेने परिसरांतील लोकांमध्ये घबराट पसरली असुन हत्या करणाऱ्या दोघा भावांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तर नोव्हेंबर 1ला 14 वर्षाचा विद्यार्थी बिलाल शेख याचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली.

3 नोव्हेंबरला 28 वर्षांच्या असिफ शेख यांचीदेखील हत्या करण्यात आली होती.

5 नोव्हेंबरला भिवंडीमध्ये वाशिम खान याची पाण्याच्या वादातून हत्या करण्यात आली होती.

7 नोव्हेंबरला शिवसेनेच्या नेत्याच्या भाच्याची उल्हासनगरमध्ये हत्या करण्यात आली तर तर एका 22 वर्षाच्या मुलाची त्याच्या भावानेच हत्या केल्याचा प्रकार उघड झाला होता.

8 नोव्हेंबरला भालचंद्र पावशे या 30 वर्षाच्या इसमाची देखील हत्या करण्यात आली.

11 नोव्हेंबरला एका भंगार विक्रेता बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांनी त्याचा मृतदेह भिवंडीत आढळून आला.


मृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2018 10:00 AM IST

ताज्या बातम्या