Mumbai: पादचारी पूल दुर्घटनेला पालिकाच जबाबदार, हा घ्या पुरावा

1981 साली हा पूल बांधण्यात आला होतो. तेव्हापासून याच्या देखभालीची जबाबदारी पालिकेकडे आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 15, 2019 01:35 PM IST

Mumbai: पादचारी पूल दुर्घटनेला पालिकाच जबाबदार, हा घ्या पुरावा

मुंबई, 15 मार्च: मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी रात्री एक पादचारी पूल कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला. यात 3 महिलांचा देखील समावेश आहे. या दुर्घटनेत 33 जण जखमी झाले आहेत. पूल दुर्घटनेला मुंबई महानगरपालिकाच जबाबदार असल्याचे या ऑडिट रिपोर्टमधून समोर आले आहे. काहीच दिवसांपूर्वी अंधेरीत एका पुलाचा काही भाग कोसळला होता. त्याच्याआधी या पुलाचे ऑडिट करण्यात आले होते. 1981 साली हा पूल बांधण्यात आला होतो. तेव्हापासून याच्या देखभालीची जबाबदारी पालिकेकडे आहे.

Mumbai Bridge Collapse : सनदशीर मार्ग प्रशासनाला समजत नाही, राज ठाकरेंचं खरमरीत पत्र

ऑडिट रिपोर्टनुसार पालिकेला पुलाची दुरुस्ती करण्यास सांगितली होती. पण त्याकडे लक्ष दिले गेले नाही. जर ऑडिट रिपोर्टनुसार पुलाची दुरुस्ती केली असती तर गुरुवारी रात्री झालेली दुर्घटना टळली असती. या दुर्घटनेची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. तसेच आझाद पोलिस ठाण्यात आयपीसी कलम 304 ए नुसार मध्य रेल्वे आणि पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SPECIAL REPORT : पूल की मृत्यूची टांगती तलवार?

दरम्यान या प्रकरणी पालिकेचे आयुक्त मेहता यांना अटक करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. या घटनेला रेल्वेमंत्री पियुष गोयल जबाबदार असल्याचे सांगत त्यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना मंत्रिपदावरुन काढून टाकले जावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पुन्हा पुन्हा होणाऱ्या अशा घटनेला मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

Loading...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेसंदर्भात माहिती मिळवण्यासाठी पालिकेने 1916, 9833806409, 022-22621855, 022-22621955 हे नंबर सुरु केले आहेत.


CSMT Bridge Collapse : पूल दुर्घटना सीसीटीव्हीत कैद, पाहा व्हिडीओ


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 01:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...