Home /News /mumbai /

...आणि काही क्षणात 5 वर्षांच्या चिमुकल्याचा लिफ्टमध्ये गेला जीव, अंगावर शहारे आणणारा मुंबईतील VIDEO

...आणि काही क्षणात 5 वर्षांच्या चिमुकल्याचा लिफ्टमध्ये गेला जीव, अंगावर शहारे आणणारा मुंबईतील VIDEO

लहान मुलाला एकटं नका सोडू, मुलांची काळजी घ्या! 5 वर्षांच्या चिमुकल्यासोबत नेमकं काय घडलं वाचा

    मुंबई, 29 नोव्हेंबर : मुलं खेळत असल्यानं आपलं त्यांच्याकडे काही वेळा दुर्लक्ष होतं आणि भयंकर अपघात घडत असल्याचा घटना समोर आल्या आहे. एक चुकीची शिक्षा चिमुकल्याला मिळाली आहे. लिफ्टमधून बऱ्याचदा लहान मुलांना जाण्यासाठी मनाई केली जाते तरीदेखील अनेक ठिकाणी मुलं जातात त्यातून एक भीषण अपघात समोर आला आहे. 5 वर्षांचा चिमुकला सेफ्टी डोअर आणि लिफ्टच्या ग्रीलमध्ये अडकला आणि लिफ्टसोबत फरफटत खाली गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना लिफ्टमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुंबईतील धारवी परिसरात शाहूनगर पोलीस ठाण्यात अंतर्गत कोझी शेल्टर नावाच्या इमारतीमध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे. 402 प्लॅटमध्ये राहणाऱ्या दोन बहिण आणि भावाने लिफ्टमधून जाण्याचा निर्णय घेतला. 7 आणि 3 वर्षांचा दोन बहिणींसह 5 वर्षांचा चिमुकला लिफ्टमधून घरी परत जात असताना हा अपघात झाला. नेमकं काय घडलं? खाली खेळून घरी परत जात असताना दोन बहिणींसोबत 5 वर्षांचा चिमुकला लिफ्टमध्ये शिरला. तिघांनी लिफ्टचं दार नीट बंद केलं बटण दाबलं आणि तिघेही घरी जाण्यासाठी लिफ्टमधून निघाले. चौथ्या मजल्यावर लिफ्ट थांबली आणि दोन बहिणी बाहेर आल्या. मात्र 5 वर्षांचा चिमुकला बाहेर न येता सेफ्टी डोरमध्ये राहिला. दोन बहिणींना आपला भाऊ आला नाही हे समजलंच नाही. त्यांनी लिफ्टचा सेफ्टी दरवाजा बंद केला. 5 वर्षांचा चिमुकला सेफ्टी दरवाजा आणि ग्रीलच्या मध्ये राहिला आणि लिफ्ट सुरू झाली. या लिफ्टसोबत चिमुकला फरफटत गेला. या अपघातात चिमुकला गंभीर जखमी झाला होता. त्याला रेस्क्यू करून सायन रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मोहम्मद असं 5 वर्षांच्या चिमुकल्याचं नाव आहे. ग्रील आणि सेफ्टी दरवाज्यात अडकून लिफ्ट सुरू झाल्यानं त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना इमारतीमधील लिफ्टमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आता चौकशी सुरू आहे. लिफ्टमध्ये बऱ्याचदा 10 वर्षांच्या खालील मुलांना एकट्यानं न जाण्याचं आवाहन केलं जातं तरी देखील ही मुलं आत शिरली. पालकांनी मुलांकडे लक्षं ठेवायला हवं. इतकच नाही तर लिफ्टमधून प्रवास करताना कायम पालक त्यांच्यासोबत असायला हवेत. तरच अशाप्रकारचे अपघात होण्यापासून टळतील. पोलिसांनी इमारतीतील रहिवाशांनाच नव्हे तर इतर रहिवाशांनासुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत की लिफ्टमध्ये जाताना मुलांसह त्यांचे पालक असलेच पाहिजे, तसेच कोणत्याही परिस्थितीत. ते एकटे सोडू नका, तसेच कोणालाही लिफ्टमनशिवाय लिफ्टमध्ये जाऊ दिले जाऊ नये अशा सूचना देखील दिल्या आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Cctv, Mumbai

    पुढील बातम्या