मुंबईत पोलिसांच्या गाडीचा टायर फुटला, अपघातात 5 जण जखमी

मुंबईत पोलिसांच्या गाडीचा टायर फुटला, अपघातात 5 जण जखमी

न्यायालयीन कामकाजा करता रेल्वे पोलीस मुंबईला गेले होते. परतीच्या प्रवासात अपघात झाला.

  • Share this:

ठाणे, 30 मे : मुंबईमध्ये गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात ठाणे रेल्वे पोलीसमधील एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. मुंबई फ्री वे वर हा अपघात झाला. न्यायालयीन कामकाजा करता रेल्वे पोलीस मुंबईला गेले होते. परतीच्या प्रवासात अपघात झाला. यामध्ये जखमी झालेल्या दोन रेल्वे पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत.

ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे येथील पोलीस पथक हे भायखळा जेल येथे महिला आरोपीचा ताबा घेऊन पुन्हा ठाणे येथे बोलेरो शासकीय वाहन क्र. MH-05-P-130 ने जात असताना फ्री वे, नॉर्थ बॉण्ड, मुंबई या ठिकाणी बोलेरो या गाडीचा पुढील बाजूचा उजवा टायर फुटल्यामुळे सदरची गाडी डिव्हायडरला धडकून ड्रायव्हर कडील बाजूस पडली.

या गाडीचे वाहन चालक पो.शिपाई केडया वसावे, वय 30 वर्षे, रा.ठी. शिववैभव हे गंभीर जखमी झाले. तसेच गाडीतील 1) पो.ह. काळे 2) म.पो.ना. श्रीमती गांगवे 3) म.पो.शि. शनागर 4) महिला आरोपी यास्मिन पाशा शेख हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना जे. जे. हॉस्पिटल येथे नेले असता वाहन चालक वसावे यांना आंतररुग्ण म्हणून दाखल केले असून इतर किरकोळ जखमींना औषधोपचार करून सोडणार आहेत.

First published: May 30, 2020, 10:55 PM IST

ताज्या बातम्या