मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई मनपाच्या रुग्णालयात तीन दिवसांत 4 बालकांचा मृत्यू, आरोग्य विभागाचा वरिष्ठ अधिकारी निलंबित : एकनाथ शिंदे

मुंबई मनपाच्या रुग्णालयात तीन दिवसांत 4 बालकांचा मृत्यू, आरोग्य विभागाचा वरिष्ठ अधिकारी निलंबित : एकनाथ शिंदे

मुंबई मनपाच्या रुग्णालयात तीन दिवसांत 4 बालकांचा मृत्यू, आरोग्य विभागाचा वरिष्ठ अधिकारी निलंबित

मुंबई मनपाच्या रुग्णालयात तीन दिवसांत 4 बालकांचा मृत्यू, आरोग्य विभागाचा वरिष्ठ अधिकारी निलंबित

मुंबईतील रुग्णालयात चार बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे विधानसभेत पडसाद उमटले. या घटनेप्रकरणी विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेत कारवाई करण्याची मागणी केली.

मुंबई, 23 डिसेंबर : महानगरपालिकेच्या (BMC) भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहातील (Savitribai Jyotiba Phule Maternity Home) वातानुकुलित यंत्रणेमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे नवजात अर्भकांसाठीच्या अतिदक्षता कक्षातील चार दुर्दैवी बालकांचा सेफ्टीक शॉकने (Septic Shock- Infection)मृत्यू झाला. या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद उमटले आणि विरोधकांनी आक्रमक होत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीक केली. (4 child died in Savitribai Jyotiba Phule Maternity Home Bhandup Mumbai)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, या बालकांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे. अशा घटना रोज घडत असतील आणि यावर चर्चा होत नसतील तर कसं चालेल? त्यामुळे माझी विनंती आहे की, हे सर्व कामकाज थांबवा आणि या मुद्द्यावर चर्चा करा. माझं तर मतं आहे की, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा मंत्री महोदयांनी केली पाहिजे.

वाचा : Winter Session: सभागृहात सदस्यांच्या चेहऱ्यावर मास्क नसल्याने अजित पवारांनी दर्शवली नाराजी

लहान बालकांचा मृत्यू झाला आहे एका बालकाचा आज मृत्यू झाला आहे. हे किती गंभीर आहे. संवदेशनशीलता बोथट करुन चालणार नाही. केवळ विरोधी पक्षाने काहीतरी मांडलंय म्हणून त्यांना खाली बसवायचं त्यांचं चालू द्यायचं नाही असं चालणार असले तर ते चुकीचं आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. हे कोणाला नाकारता येणार नाही. पण यात दोषी कोण आहे याची चौकशी तर आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. दोषीला शिक्षा झालीच पाहिजे निर्दोषला शिक्षा होता कामा नाही. यामुळे याची चौकशी होऊन दोषीवर कारवाई होईल. कुणालाही पाठिशी घालण्याचं कारण नाही.

हे वेळ मारुन नेण्याचं काम आहे. आमची मागणी आहे तात्काळ या संदर्भात कारवाई करा. मुंलुंडला झाली, नायरला झाली अशा घटना रोज होत असतील आणि आम्ही चौकशी करू म्हणत असतील तर... संबंधित अधिकाऱ्याचं तात्काळ निलंबन केलंच पाहिजे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, संबधित आरोग्य विभागाचे MOH अधिकारी यांचे निलंबन करण्यात आलं आहे.

वाचा : मंत्री आदित्य ठाकरेंसह नेत्यांना जीवे मारण्याची धमकी, चौकशीसाठी SIT स्थापनेची गृहमंत्र्यांची घोषणा

महापौरांच्या दालनाबाहेर आंदोलन

तर तिकडे मुंबई महानगरपालिकेत भाजपने आक्रमक पवित्रा घेत महापौर किशोरी पेडणेकर यांंच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. भांडुप सावित्रीबाई फुले मनपा रूग्णालयात तीन नवजात बालकांच्या मुत्युला जबाबदार कोण? हा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत महापौर किशोरी पेडणेकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

First published:

Tags: BMC, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Winter session