मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Mumbai: भरदिवसा घरातून तीन महिन्यांच्या बाळाचं अपहरण, मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai: भरदिवसा घरातून तीन महिन्यांच्या बाळाचं अपहरण, मुंबईतील धक्कादायक घटना

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Mumbai Crime News : मुंबईत भरदिवसा घरातून बाळाचं अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

मुंबई, 1 डिसेंबर : मुंबईत भरदिवसा घरातून एका बाळाचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील काळाचौकी (Kalachowki, Mumbai) परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी महिलेचा शोध सुरू करण्यात आला आहे. (3 month child abducted from Mumbai)

आरोपी महिलेने डाव साधला

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही जुने कपडे आणि मोबाइल घेऊन त्याच्या बदल्यात भांडी, बास्केट देण्यासाठी आली. काळाचौकी परिसरात ही महिला आली. यावेळी घरात एकट्या असलेल्या बाळाच्या आईला एक बास्केट खरेदी करायचा असल्याने तिने या महिलेला बोलावले. त्यानंतर आरोपी महिलेने त्यांच्याकडून जुना मोबाइल मागितला. तो मोबाइल आणण्यासाठी ज्यावेळी बाळाची आई घरातील दुसऱ्या खोलीत गेली. त्यावेळी आरोपी महिलेने डाव साधला.

बाळ आणि आरोपी महिला गायब

बाळाची आई दुसऱ्या खोलीत गेल्याचे पाहून भांडी विक्रीसाठी आलेल्या महिलेने बाळाला एकटे पाहून त्याला उचललं आणि घरातून पळ काढला. ज्यावेळी बाळाची आई खोलीतून बाहेर आली तेव्हा बाळ नसल्याचं पाहून त्यांना मोठा धक्का बसला. तसेच भांडी विक्रीसाठी आलेली महिलाही तेथे नव्हती. यावेळी आपल्या बाळाचं अपहरण झालं असल्याचं पीडित महिलेच्या लक्षात आलं.

वाचा : 'मुलीला आणतोय, दारूची व्यवस्था कर', एका कॉलमुळे अपहरण झालेल्या तरुणीसोबतचा प्लॅन फसला

सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू

सदर भांडी विक्री करणारी महिला ही बाळाला घेऊन जात असातना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याच परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ती महिला बाळाला घेऊन जात असल्याचं दिसत आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत.

मुंबईत 20 वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद कृत्य

मुंबईतील कुर्ला परिसरात एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना चार दिवसांपूर्वी समोर आली आहे. आरोपींनी बंद पडलेल्या इमारतीच्या टेरेसवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. त्यानंतर आरोपींनी तिची निर्घृण हत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचा मृतदेह कुर्ला परिसरातील एचडीआयएल कंपाऊंडमधील बंद इमरातीच्या टेरेसवरील लिफ्ट रुममध्ये आढळला आहे. 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली असावी, अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. ही घटना कधी घडली, पीडित तरुणी नेमकी कोण आहे, तिच्यावर बलात्कार करणारे आरोपी कोण आहेत, याविषयी अद्याप कुठलीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून तपासाला वेग दिला आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Kidnapping, Mumbai