वाढदिवसाचा केक खाल्ल्यानं विषबाधा, 28 जणांची प्रकृती अत्यवस्थ

वाढदिवसाचा केक खाल्ल्यानं विषबाधा, 28 जणांची प्रकृती अत्यवस्थ

भगवती रुग्णालयात उपचारासाठी दाखल, 11 महिला आणि 5 पुरुषांसह लहान मुलांचा समावेश.

  • Share this:

प्रणाली कापसे (प्रतिनिधी) मुंबई, 12 सप्टेंबर: दहिसर भागात विषबाधा झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. कांदीवली जवळचा कांदरपाडा भागात ही घटना समोर आली आहे. जवळपास विषबाधा झालेल्या 28 जणांना तातडीनं भगवती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. दरम्यान परिसरामध्ये तणावाचं वातावरण असल्यानं विषबाधा कशामुळे झाली याची चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कांदरपाडा परिसरात वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आलेल्या पाहुण्यांना आणि लहान मुलांना केक खाण्यासाठी देण्यात आला. केक खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडल्याचं लक्षात आलं. अनेकांना उलट्या होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे केक खाल्यानं विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये 11 महिला 7 पुरुष आणि लहान मुलांचा समावेश आहे. सगळ्यांना हगवण लागली आहे तर काही जणांना ताप आणि हगवण लागल्यामुळे अशक्तपणाही आला आहे. सुरुवातील अत्यावस्थ असणाऱ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आता 28 जणांवरही भगवती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केकमधून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दहिसर पश्चिम येथील कांदारपाडा तलाव शेजारी राहणारे अर्जुन सिग यांच्या घरी 10 डिसेंबर रोजी आराध्य सिंह मुलीचा पहिला वाढदिवसा साजरा करण्यात आला होता. त्यानंतर सकाळ पासून परिसरातील नागरिकांना उलटी , जुलाब सुरू झाल्यावर जवळच्या भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये 11 महिलांचा समावेश तर 7 पुरुष , चार लहान मुलांचा समावेश इतर खाजगी रुग्णालयात 6 जण दाखल करण्यात आले. एकूण 28 जण रुग्णालयात दाखल आहेत. या घटनेनंतर केक दुकानाला सील करण्यात आले असून दुकानातील नमुने अन्न ओषध प्रशासन तपासणी करता पाठवण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2019 01:19 PM IST

ताज्या बातम्या