धक्कादायक! वाढदिवशीच मृत्यूचं गिफ्ट, मुंबईत मित्रांनीच केली मित्राची निर्घृण हत्या

धक्कादायक! वाढदिवशीच मृत्यूचं गिफ्ट, मुंबईत मित्रांनीच केली मित्राची निर्घृण हत्या

मुंबईतील घाटकोपर परिसरात आपापसातल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मित्रांनीच रक्तरंजित कट रचून आपल्या मित्राचा त्याच्या जन्मदिनी जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : मुंबईतील घाटकोपर परिसरात आपापसातल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मित्रांनीच रक्तरंजित कट रचून आपल्या मित्राचा त्याच्या जन्मदिनी जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी (28 जुलै)पंत नगर परिसरातील हा प्रकार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितेश सावंत (वय 27 वर्ष) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. नितेश आपल्या मित्रांसोबत एका पार्कमध्ये आपला वाढदिवस साजरा करत होता. याचदरम्यान मित्रांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यास सुरुवात केली. नितेशवर हल्ला केल्यानंतर हे सर्व जण फरार झाले आहेत. जवळपास 7 ते 8 जणांनी नितेशची हत्या केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात नितेश गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस लगेचच घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीनं पोलिसांनी नितेशला तातडीनं जवळील राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

(वाचा : पिंपरी शहर हादरलं; 3 मुलांसह महिलेची गळफास लावून आत्महत्या!)

(वाचा :भावाने बहिणीला 'किस' केलं म्हणजे सेक्स होतो का? बिहारच्या नेत्याचं बेताल वक्तव्य)

पोलिसांच्या माहितीनुसार, आठवडाभरापूर्वी नितेश आणि त्याच्या मित्रांमध्ये कुठल्यातरी गोष्टीवरून बाचाबाची झाली होती. हा वाद नितेश विसरला होता, पण मित्रांच्या डोक्यात मात्र वाद अजूनही कायम होता. हाच राग मनात ठेऊन मित्रांनी नितेशचा काटा काढण्याचं षड़यंत्र रचलं. शनिवार (27 जुलै) नितेशचा वाढदिवस होता. पण या मित्रांनी वाढदिवस रविवारी पुन्हा साजरा करण्याच्या बहाण्यानं त्याला पार्कात बोलावून घेतलं आणि त्याच्यावर धारदार शस्त्रानं सपासप वार केले.

(पाहा : महापुरातून गटारात आली मगर, नागरिकांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO)

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसंच दोन-तीन जणांचा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. नितेश सावंतच्या हत्या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

VIDEO: धक्कादायक! हातपाय बांधून उलटं लटकवून ड्रायव्हरला अमानुष मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 08:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...