Mumbai 26/11: त्या एका चहानं माझा जीव वाचला...मीच विकत असलेल्या पेपरात माझी मेल्याची बातमी आली असती

Mumbai 26/11: त्या एका चहानं माझा जीव वाचला...मीच विकत असलेल्या पेपरात माझी मेल्याची बातमी आली असती

गेल्या 30 वर्षांपासून मुंबईत असलेल्या व्यक्तीने 26/11 दहशतवादी हल्ल्याला डोळ्यादेखत पाहिलेलं आहे. त्या हल्ल्यानंतरही त्यानं मुंबई सोडली नाही.

  • 41
  • Last Updated: Feb 21, 2019 03:34 PM IST
  • Share this:

२६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री मुंबईवर देशातील सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात एकूण १६४ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्या रात्री मुंबईच्या रस्त्यावर निष्पाप लोकांचे बळी गेले. त्याच रात्री एका व्यक्तीनं स्वत:च्या मृत्यूला आणि इतरांच्या मृत्यूचं कारण बनलेल्या दहशतवादी अजमल कसाबला फार जवळून पाहिलं. न्यूज१८ लोकमतच्या वेबसाइटशी बोलताना १० वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याच्या त्या कटू आठवणींना उजाळा देत ते म्हणाला की, 'चहा प्यायचा मोह मला आवरला नसता तर दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात माझ्याच मृत्यूची बातमी आली असती.'

ही घटना आहे २६/११ हल्ला खूप जवळून पाहिलेल्या बिहारच्या अविनाश यांची.  मुंबईला स्वप्नांच शहर म्हटलं जातं. या मुंबईमध्ये कोणीही उपाशी राहत नाही. अविनाश गेल्या ३० वर्षांपासून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर पेपर विक्रीचा व्यवसाय करतात. अविनाशच्या मुंबईसोबत खूप आठवणी जोडल्या गेल्या आहेत. १० वर्षांपूर्वींची ती रात्र त्यांच्यासाठी एका भयानक स्वप्नासारखी होती.

अविनाश यांनी सांगितलं की, 'दररोजप्रमाणे त्या रात्रीसुद्धा मी माझं काम संपवून पेपर आणि पत्रिका एकत्र करुन स्टेशनच्या बाहेर चाललो होतो. साधारण रात्रीचे नऊ वाजले असतील. स्टेशनच्या पेपर स्टॉलवरून पेपर, पुस्तकांचा हिशोब करुन बाहेर जाताना माझ्या मित्रानं चहा पिण्यासाठी हाक मारली. त्याने जेव्हा हाक मारली तेव्हा खरंच वाटलं होतं की थांबावं पण त्यावेळेस काय झालं काही कळले नाही पण मनाला तिथे थांबणं पटत नव्हतं. मी हळुहळु एका प्लॅटफॉर्महून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जात बाहेरचा रस्ता गाठला.

मी स्टेशनच्या बाहेर आलो आणि तेवढ्यात मला आरडा-ओरड झाल्याचा आवाज आला. थोड्या वेळासाठी काय चालंलय हे मला कळत नव्हतं. अचानक लोकांची धावपळ सुरू झाली. फायरींगचा आवाज यायला लागला. मीदेखील लोकांच्या बरोबरीने तिथून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत स्टेशनच्या बाहेर येऊन उभा राहिलो. माझ्या डोळ्यांदेखत लोक मारली गेली होती. त्याचवेळी कसाब माझ्या जवळ आला. त्याक्षणी मला वाटलं की आता आपली मरणाची वेळ जवळ आली आहे मरणातून सुटका होणं आता कठीण होतं. पण लगेचच कसाब तिथून पळत निघून गेला आणि माझा जीव वाचला.'

बिहारहून रोजगारासाठी आलेले अविनाश अजूनही त्याच ठिकणी पेपर विक्री करत आहेत. एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतरही अविनाशच्या मनात गावी परत जाण्याचा विचार आला नाही. पण मृत्यूला आपण जवळून पाहिलं आहे याची जाणीव त्यांना आहे.

म्हणून अविनाश यांना आजही वाटतं की त्या दिवशी ते चहा प्यायला बाहेर गेले नसते तर कसाबच्या गोळीनं त्यांचं आयुष्य संपलं असतं. या हल्ल्यात अविनाश यांनी चहासाठी बोलावणाऱ्या मित्राला मात्र गमावलं. कसाबच्या फायरिंगमध्ये तो मारला गेला.

First published: November 25, 2018, 11:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading