मुंबईहून विमान प्रवास करणार असाल, तर नक्की वाचा!

मुंबईहून विमान प्रवास करणार असाल, तर नक्की वाचा!

मुंबई विमानतळावरील ५ हजारांपेक्षा जास्त विमान फेऱ्या रद्द होणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 8 फेब्रुवारी : जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक विमानतळ म्हणजे मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. एका दिवशी तब्बल 969 विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंगचा विक्रम मुंबई विमानतळाच्या नावावर आहे. पण, आता हेच विमानतळ आठवड्यातून 3 दिवस सकाळी 11 ते संध्याकाळ 5 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. धावपट्टीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एका दिवशी 230 विमानं रद्द करण्यात आली आहेत. 7 फेब्रुवारी ते 30 मार्च दरम्यान आठवड्यातील 3 दिवस मंगळवार, गुरूवार आणि शनिवार या दिवशी विमानतळाच्या धावपट्टीचं काम केलं जाणार आहे. याचा फटका विमानांच्या टेक ऑफ आणि लँडिंगला बसणार आहे.

मुंबई विमानतळावरील एका रनवेवरून तासाला 50 तर, दुसऱ्या विमानतळावरून तासाला 35 विमानांचं टेकऑफ आणि लँडिंग केलं जातं. पण, आता रनवे बंद ठेवण्यात येणार असल्यानं त्याचा परिणाम हा वाहतुकीवर होणार आहे.

मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये

- मुंबई विमानतळावर दोन धावपट्ट्या आहेत. ज्या एकमेकांना क्रॉस करतात. त्यामुळे एका वेळी एकच विमान लँडिंग किंवा टेकऑफ करू शकतं.

- वर्दळीच्या वेळी दर पाच मिनिटांना 4 विमानांची वाहतूक होते. ज्यामध्ये 2 लँडिंग, 2टेक ऑफचा समावेश आहे.

- 2 विमानांच्या वाहतुकीदरम्यान हवाई वाहतूक नियंत्रकाला केवळ 65 सेकंद मिळतात.

- मुंबई विमानतळावर रोज दर तासाला 46 विमानं हाताळण्याची क्षमता आहे. मात्र, प्रत्यक्षात शुक्रवारी सकाळ-संध्याकाळ दर तासाला 50 विमानांचं लँडिंग किंवा टेकऑफ होतं.

- एक धावपट्टी असलेलं सगळ्यात व्यस्त विमानतळाचा जागतिक रेकॉर्ड यापूर्वीही मुंबईच्याच नावावर होता.

- याशिवाय प्रवाशांच्या ये-जाच्या आकडेवारीनुसार दिल्लीचं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ देशात पहिलं आणि मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

===============

First published: February 8, 2019, 4:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading