मुंबई 23 बांगलादेशींना अटक, 'मनसे'च्या मोर्चानंतर पोलिसांची धडक कारवाई

मुंबई 23 बांगलादेशींना अटक, 'मनसे'च्या मोर्चानंतर पोलिसांची धडक कारवाई

हे सर्व बांगलादेशी भंगारचा व्यवसाय व मोलमजुरी करण्यासाठी आले होते. या लोकांनी मराठीही शिकून घेतल्याचं स्पष्ट झालंय.

  • Share this:

विजय देसाई, मुंबई 12 फेब्रुवारी : विरार पश्चिमेकडील अर्नाळा सागरी पोलिस ठाण्या अंतर्गत  दहशदवाद विरोधी पथक व मानवी तस्करी विरोधी शाखेने कारवाई करून 23 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घुसखोर पाकिस्तानी आणि बांगलादेशींना हाकलण्यासाठी  9 तारखेला मोर्चा काढला होता. त्यानंतर पोलिसांनी ही धडक करवाई केलीय. याबाबतची माहिती मनसेच्या स्थानिक शाखेने पोलिसांना दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

मानवी तस्करी विरोधी विभागाच्या पालघर शाखेचे महेश गोसावी यांना अर्नाळा विभागात बांगलादेशी असल्याची खबर मिळताच पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे, दहशदवाद विरोधी पथकाचे मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  मनसेच्या मदतीने  23 बांगलादेशींना ताब्यात घेतले आहे.

राज्यातील वाड्या-वस्त्यांच्या नावांमधून ‘जात’ हद्दपार होणार

विरार पश्चिम येथील कळंब ,अर्नाळा परिसरातून  मनसेचे नालासोपारा शहर उपाध्यक्ष संजय मेहरा यांनी पंच म्हणून पोलिसांसोबत घाटनास्थळी जात कारवाईसाठी पोलिसांना मदत केली. पळून जाणाऱ्या बांगलादेशींना पकडण्यासही मदत केली. या लोकांनी मराठीही शिकून घेतल्याचं स्पष्ट झालंय.

सोन्याच्या अंगठ्या चोरताना अभिनेत्रीला अटक, पुण्यातल्या मॉलमधली घटना

हे सर्व बांगलादेशी भंगारचा व्यवसाय व मोलमजुरी करण्यासाठी आले होते असं पोलीस तपासात उघड  झालंय. मंगळवारी रात्री 11 वाजल्यापासून ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी पहाटे 4 अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

First published: February 12, 2020, 1:39 PM IST

ताज्या बातम्या