Home /News /mumbai /

Mumbai: सफाई कर्मचाऱ्याने चुकीचे इंजेक्शन दिल्याने दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू, मुंबईतील घटनेने खळबळ

Mumbai: सफाई कर्मचाऱ्याने चुकीचे इंजेक्शन दिल्याने दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू, मुंबईतील घटनेने खळबळ

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

2 Year old Child died after wrong injection inject in Mumbai hospital: मुंबईतील रुग्णालयात चुकीचं इंजेक्शन दिल्याने एका दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

    मुंबई, 21 जानेवारी : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून (Mumbai) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दोन वर्षांच्या मुलाला चुकीचं इंजेक्शन दिल्याने त्याचा मृत्यू (2 year old child died after wrong injection) झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या मुलाला रुग्णालयातील एका सफाई कर्मचाऱ्याने (sweeper) हे चुकीचं इंजेक्शन दिलं असल्याचं वृत्त समोर येत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यासह रुग्णालय मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. शिवाजी नगर पोलिसांनी बुधवारी मुंबईतील गोवंडी परिसरात असलेल्या नूर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार आणि रुग्णालयाच्या मालकाविरुद्ध एफआयआर नोंदवला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या संदर्भात टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जानेवारी रोजी एका दोन वर्षांच्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी रुग्णालयातील एका 18 वर्षीय सफाई कर्मचाऱ्याने कथितरित्या चिमुकल्याला इंजेक्शन दिले होते. हे इंजेक्शन त्याच वॉर्डमध्ये दाखल असलेल्या मलेरियाच्या रुग्णासाठी होते असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 13 जानेवारी रोजी या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी रुग्णालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. मृतक चिमुकल्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला होता. वाचा : चुकीचं इंजेक्शन दिल्याने पेशंटचा मृत्यू, नर्सला अटक मुलाच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे, डॉक्टर अल्ताफ खान, नर्स सलीमुन्निसा खान (21), सफाई कामगार नर्गिस आणि हॉस्पिटल मालक नसरुद्दीन सय्यद (63) यांच्याविरुद्ध कलम 304 - ए (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आपला तपास सुरू केला आहे. मात्र, अद्यापही या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आलेली नाहीये. कल्याणमध्ये दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू कल्याणमध्ये उपचारादरम्यान एका दीड वर्षीय चिमुकलीचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. हा मृत्यू डॉक्टराने चुकीचे उपचार केल्याने झाल्याचा आरोप चिमुकलीच्या आईने केला होता. त्यानंतर डिसेंबर महिन्यात या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने डॉक्टर एस. ए. आलम आणि त्याचा सहकारी मोहम्मद ताज अन्सारीच्या विरोधात कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पप्पू सहानी आणि मुन्नी सहानी हे आपल्या दीड वर्षाच्या मुलीसोबत कल्याण पूर्व कचोरे परिसरात राहतात. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या दीड वर्षाच्या मुलीला ताप आल्याने पप्पू आणि त्यांची पत्नी मुन्नी हे दोघे मुलीला घेऊन सूचक नाका परिसरात असलेल्या हसन क्लिनिकमध्ये गेले. त्यावेळी डॉक्टरांनी मुलीला काही औषध दिली. मात्र औषध घेतल्यानंतर मुलीला जास्त त्रास होऊन तिचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या कुटूंबियांना केला होता.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Mumbai

    पुढील बातम्या