Mumbai Marathon 2020 मध्ये कोणी मारली बाजी?

Mumbai Marathon 2020 मध्ये कोणी मारली बाजी?

या स्पर्धेत देश-विदेशातील एकूण 55 हजार 322 धावपटू सहभागी झाले होते.

  • Share this:

मुंबई, 19 जानेवारी: कडाक्याच्या थंडीत मुंबई 17 व्या टाटा मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धोला देशविदेशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. जवळपास धावण्यातील सर्व प्रकारच्या स्पर्धेत मिळून 55 हजारहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून सुरुवात झाली होती. मुंबई मॅरेथॉन मध्ये एलिट प्रकार मधल्या स्पर्धेचा निकाल नुकताच लागलाय परदेशीं खेळाडूंमध्ये केनियाच्या हुरीसा याने सर्वप्रथम रेस पूर्ण केली. भारतीय खेळाडूंमध्ये श्रीनु हा विजेता झाला आहे. हाफ मॅरेथॉन महिलामध्ये उत्तर प्रदेशची पारुल चौधरी आणि दुसऱ्या स्थानावर कोल्हापुरची आरती पाटील विजयी झाली आहे. तसंच हाफ मॅरेथॉन पुरुष गटामध्ये हैदराबादचा तीर्थने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यासोबतच दक्षिण, मध्य आणि पोलिसांच्या पश्चिम विभागातील स्थानिक पोलिसांबरोबरच, दोन हजार अतिरिक्त पोलिस, 600 वाहतूक पोलिस, 3 हजार स्वयंसेवक, 300 वॉर्डन तसेच राखीव पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

मुंबईत शनिवारी 12 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती. गुलाबी थंडीमध्ये 55 हजारहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये पोलीस, डॉक्टर, वेगवेगळ्या पदावरचे अधिकारीही सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2020 11:39 AM IST

ताज्या बातम्या