Elec-widget

मराठा समाजाला किती टक्के मिळणार आरक्षण? एकनाथ शिंदेंची माहिती

मराठा समाजाला किती टक्के मिळणार आरक्षण? एकनाथ शिंदेंची माहिती

आरक्षणासाठी मांडण्यात येणाऱ्या विधेयकाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक पार पडली.

  • Share this:मुंबई, 26 नोव्हेंबर : मराठा आरक्षणासाठी 29 नोव्हेंबरला विधिमंडळात विधेयक मांडण्यात येणार असून, 16 टक्के आरक्षणासाठी सरकार आग्रही असल्याची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य एकनाथ शिंदे यांनी दिली.


आरक्षणासाठी मांडण्यात येणाऱ्या विधेयकाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक पार पडली. 29 तारखेला पटलावर मांडण्यात येणारं विधेयक 30 तारखेपर्यंत मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असं एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं.

Loading...


महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळाच्या दालनात ही बैठक पार पडली. या बैठकीला विनोद तावडे, सुभाष देशमुख, राम शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, संभाजी निलंगेकर, विष्णू सावरा, एकनाथ शिंदे आणि दीपक सावंत उपस्थित होते.


दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भातला एटीआर म्हणजेच संपूर्ण अहवाल सादर करायचा की नाही यासंदर्भात उद्या होणाऱ्या गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.


तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणारी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठकी उद्या मंगळवारी सकाळी होणार आहे.


दरम्यान,आंदोलकांच्या धरपकडीमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला. विधानभवनावरचा धडक मोर्चा काढण्याआधीच राज्यभरात ठिकठिकाणी दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली.


विधान भवनावरचा धकड मोर्चा मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी मुंबईच्या वेशीवरच आंदोलकांची नाकेबंदी केली. एवढंच नाहीतर नाशिक, पुणे, कोल्हापूर ठाणे अशा प्रमुख शहरांमधूनही संवाद यात्रेसाठी निघालेल्या मराठा आंदोलकांची धरपकड करण्यात आली.


या धरपकडीविरोधात विरोधकांनी विधानभवनातही आवाज उठवला. सरकार मराठ्यांचा आवाज दाबत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

=========================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2018 07:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...