मुंबई विमानतळावर तब्बल 4 कोटी 15 लाखांचं 15 किलो सोनं जप्त

मुंबई विमानतळावर तब्बल 4 कोटी 15 लाखांचं 15 किलो सोनं जप्त

मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 15 किलो सोनं जप्त करण्यात आलंय.

  • Share this:

29 जानेवारी : मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 15 किलो सोनं जप्त करण्यात आलंय. या सोन्याची किंमत तब्बल 4 कोटी 15 लाख 4 हजार आहे. कस्टम विभागाची आतापर्यंतची ही सर्वात मोठी कामगिरी आहे.

कस्टमच्या एअर इंटेलिजेस युनिटने विमानतळावर एका कोरियन व्यक्तिला अटक केली. किम्यून जिंग असं या व्यक्तिचं नाव आहे. किम्यून जिंग हाँगकाँगवरून भारतात येत होता.

किम्यून जिंगने  पांढऱ्या रंगाचे जॅकेट घातले होते. या जॅकेटच्या आत छोटे-छोटे पाॅकेट बनवले होते. या पाॅकेटमध्ये त्याने सोनं तस्कर करून आणलं होतं. एकूण 15 सोन्याची बिस्किटं होते. त्यांचं प्रत्येक वजन हे 1 किलो होतं. या सोन्याची किंमत तब्बल 4 कोटी 14 लाख 4 हजार इतकी होती. कस्टम विभागाची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी आहे.

First published: January 29, 2018, 11:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading