बदलापूर, आसनगावपर्यंत धावणार १५ डब्यांची लोकल

मध्य रेल्वेवरील बदलापूर, अंबरनाथ, आसनगाव आदी दूरवरच्या स्थानकांमधील प्रवाशांना जादा सुविधा पुरवण्यासाठी नवीन पर्यायांना प्राधान्य देण्यात आले आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 16, 2018 11:21 PM IST

बदलापूर, आसनगावपर्यंत धावणार १५ डब्यांची लोकल

मुंबई, 16 एप्रिल : सध्या कल्याणपर्यंतच असलेली १५ डब्यांच्या लोकलची सेवा लवकरच आसनगाव आणि बदलापूरपर्यंत विस्तारित केली जाणार आहे.

या विस्तारासह अन्य कामांसाठी मध्य रेल्वेनं सुमारे ९०० कोटी रुपयांचा बदलापूर, आसनगावलाही प्रकल्प आखण्यास सुरुवात केली आहे. मध्य रेल्वेवरील बदलापूर, अंबरनाथ, आसनगाव आदी दूरवरच्या स्थानकांमधील प्रवाशांना जादा सुविधा पुरवण्यासाठी नवीन पर्यायांना प्राधान्य देण्यात आले आहे.

त्यात प्रामुख्याने १५ डब्यांच्या लोकल सेवांच्या विस्तारावर भर दिला जाणार आहे. मात्र या विस्तारात काही तांत्रिक अडचणी येणार आहेत. त्यात कल्याणपुढील स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे प्रमुख काम राहील. त्यासोबतच सद्यस्थितीत प्लॅटफॉर्मला लागून असलेल्या सिग्नल यंत्रणा अन्यत्र स्थलांतरित करणे हे मोठे आव्हान असणार आहे.

15 डबा लोकल बदलापूरपर्यंत

- 15 डब्यांची लोकल सध्या फक्त कल्याण ते सीएसटी

Loading...

- 15 डब्यांच्या गाड्या फक्त जलद मार्गावरच धावतात

- प्लॅटफॉर्मचा विस्तार करणं हे मोठं काम

- यामध्ये सिग्नल रुळ बदलण्याची यंत्रणाही हलवावी लागते

- 15 डबा लोकलचा वेग ताशी 90 किमी

- हा प्रकल्प एमयूटीपीमध्ये समाविष्ट करणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2018 11:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...