धक्कादायक ! मुंबईत 18व्या मजल्यावरून उडी घेऊन अल्पवयीन मुलाची आत्महत्या

धक्कादायक ! मुंबईत 18व्या मजल्यावरून उडी घेऊन अल्पवयीन मुलाची आत्महत्या

Crime News एका अल्पवयीन मुलानं इमारतीच्या अठराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जुलै : एका अल्पवयीन मुलानं इमारतीच्या अठराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. मुंबईच्या वडाळा परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. आयमॅक्स थिएटरजवळील 'गिरनार हाईट्स' इमारतीच्या अठराव्या मजल्यावरून उडी मारून एका 13 वर्षांच्या मुलाने आपलं आयुष्य संपवलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गुरूवारी (11 जुलै) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

(पाहा :VIDEO : साप नव्हे या आहेत अळ्या, औरंगाबादेत एका गावावर केलं आक्रमण)

यानंतर गंभीर जखमी झालेल्या या मुलाला तातडीनं सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र,डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. सध्या याप्रकरणाची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

(पाहा :राज ठाकरेंना आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसचा विरोध आहे का? अशोक चव्हाण म्हणतात...)

दरम्यान, मुलानं आत्महत्या का केली? यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसंच घटनास्थळावर पोलिसांना कोणत्याही प्रकारची सुसाईड नोटदेखील आढळून आलेली नाही.

(पाहा :VIDEO : 3 वर्षांचा चिमुरडा गटारात पडला, मुंबई पालिकेचे अधिकारी बोलायला तयार नाही)

मी मरेन पण.., दलित मुलाशी लग्न करणाऱ्या भाजप आमदाराच्या मुलीचा VIDEO व्हायरल

First published: July 11, 2019, 8:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading