मुंब्र्यातील मशिदीत सापडले 13 बांगलादेशी नागरिक, ताब्यात घेऊन केलं क्वारन्टाइन

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ताब्यात घेतलेलेे लोक 18 तारखेला झालेल्या मरकजमध्ये हे लोक सहभागी झाले नव्हते.

  • Share this:

मुंब्रा, 1 एप्रिल : ठाण्यातील मुंब्रा परिसरातील कौसा मशिदीतून 13 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हे सर्वजण 9 मार्चला निजामुद्दीन इथं गेले होते. त्यानंतर 10 मार्चला नवी मुंबईला आले आणि तिथून मुंब्र्यात पोहोचले. मात्र आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ताब्यात घेतलेलेे लोक 18 तारखेला झालेल्या मरकजमध्ये हे लोक सहभागी झाले नव्हते.

मुंब्र्यातील मशिदीतून ताब्यात घेतल्यानंतर संबंधित लोकांना क्वारन्टाईन करण्यात आलं आहे. तसंच ठाण्यातील मेडिकल टीम मुंब्र्यात पोहोचली असून या सर्वांची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे. त्यानंतर ते सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी नागरिकांकडे पासपोर्ट असून 31 मार्चला परत जाण्याचं तिकिटंही होतं.

नगरमध्येही घडला होता असाच प्रकार

कोरोनाच्या संकटाचा विळखा लक्षात घेता केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळता यावी म्हणून सरकारने हे पाऊल उचललं आहे. मात्र अशाताच नेवासा येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला. परदेशातील 10 जणांना मशिदीमध्ये लपून ठेवल्याचं उघड झालं.

परदेशातील 10 जण नेवासा येथील मशिदीत गेल्या आठ दिवसांपासून होते. हा प्रकार उघड झाल्यानंतर नेवासा पोलीस स्थानकात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मरकस मस्जिदचे ट्रस्टी जुम्माखान पठाण , सलिम पठाण यांचा समावेश आहे. तसंच मशिदीत लपलेल्या परदेशी नागरिकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या जिबूती, बेनिन, डेकॉर्ट आणि घाना देशातील दहा जणांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्या सर्वांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2020 11:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading