मुंबई, 13 जुलै : वरळी परिसरात कोस्टल रोडसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आलं आहे. बबलू कुमार पासवान असं मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे. बबलू हा महात्मा फुले नगर येथील रहिवासी होता. वरळी सी लिंक परिसरात समुद्रकिनारी खोदण्यात आलेल्या सुमारे 12 फूट खोल खड्ड्यात बबलू पडला. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्याला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आलं आणि तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
(पाहा :VIDEO: एवढी गोंडस परी कुणाला 'नकुशी' झाली?)
दरम्यान ज्या ठिकाणी खड्डा खणलेला आहे त्याठिकाणी सूचना फलक किंवा नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणत्याच गोष्टी उपलब्ध नसल्यानं बबलूचा पाय घसरून मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. कोस्टल रोडसाठी काम सुरू असताना स्थानिक पातळींवर काळजी घेण्याचं काम केले पाहिजे, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.
(वाचा : SPECIAL REPORT : छगन भुजबळांची विश्वासू कार्यकर्त्याने उडवली झोप, असं काय घडलं?)
Mumbai: A 12-year-old boy drowned in a pit dug for a Coastal Road Project at Coastal Road, Worli Sea Link today; was admitted to nearby hospital by locals where he was declared brought dead. pic.twitter.com/HYtNzOujDG
— ANI (@ANI) July 13, 2019
दरम्यान गोरेगाव येथील उघड्या नाल्यात पडून दोन वर्षांचा चिमुकला बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्यानं मुंबईकर संताप व्यक्त करत आहेत. गोरेगावमधील आंबेडकर नगरातील नाल्यामध्ये दोन वर्षाचा दिव्यांश पडून बेपत्ता झाला आहे. 10 जुलैला 9.45 वाजण्याच्या सुमारास दिव्यांश घरून बाहेर रस्त्यावर येत असताना तो उघड्या नाल्यात पडला आणि वाहून गेला. दिव्यांशला शोधत घराबाहेर आलेल्या त्याच्या आईला तो कुठेच दिसला नाही म्हणून शोध घेतला असता, तो नाल्यात पडल्याची माहिती सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आली. एक क्षण नजर चुकवून घराबाहेर आलेला दिव्यांशवर ही वेळ ओढवेल असं कुणाला वाटलंही नव्हतं. दिव्यांशला शोधण्याचे अद्यापही प्रयत्न सुरू आहेत.
(पाहा :SPECIAL REPORT : घरासमोर पडला रक्ताचा सडा, शिर्डीत 5 जणांवर कोयत्याने सपासप वार)
मुंबईकरांनो सावधान, रस्त्यावर आहे 50पेक्षा अधिक मृत्यूचे सापळे!
दोन वर्षापूर्वी पावसाचं पाणी घरात शिरू नये म्हणून एल्फिस्टन परिसरातील नागरिकांनी मॅनहोलचं झाकणं बाजूला केलं. त्यात पडून डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला. एका मॅनहोलचं झाकणं उघड ठेवल्यानं इतका मोठा अनर्थ घडला तर विचार करा जेव्हा सगळ्या रस्त्यावरच्या मॅनहोल उघडे पडले तर काय होईल? त्यामुळे मुंबईकरांनो तुमच्या जिवाला रस्त्यांवरून चालतानाही धोका आहे.
VIDEO : रस्त्यावर टिक-टॉक व्हिडिओ बनवताय तर पोलीस करू शकता कारवाई!