मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /काळा गॉगल, हातात काठी, 100 वर्षांच्या मुंबईच्या आजी Facebook वर हिट

काळा गॉगल, हातात काठी, 100 वर्षांच्या मुंबईच्या आजी Facebook वर हिट

आयुष्य रसरसून जगणाऱ्या या मुंबईच्या आजींच्या दीर्घायुष्याची ही प्रेरणादायी पोस्ट सध्या Facebook वरची सर्वात लोकप्रिय पोस्ट ठरत आहे.

आयुष्य रसरसून जगणाऱ्या या मुंबईच्या आजींच्या दीर्घायुष्याची ही प्रेरणादायी पोस्ट सध्या Facebook वरची सर्वात लोकप्रिय पोस्ट ठरत आहे.

आयुष्य रसरसून जगणाऱ्या या मुंबईच्या आजींच्या दीर्घायुष्याची ही प्रेरणादायी पोस्ट सध्या Facebook वरची सर्वात लोकप्रिय पोस्ट ठरत आहे.

    मुंबई, 8 जानेवारी: डोळ्यावर काळा गॉगल, हातात काठी घेतलेल्या, हाताचा अंगठा उंचावत दीर्घायुष्याचे रहस्य सांगणाऱ्या या गोऱ्यापान ठेंगण्याशा आजींचा फोटो पाहून अतिशय प्रसन्न वाटतं ना! दहा दशकांचा प्रवास पाहिलेल्या या आजींकडे आठवणींचा खजिना आहे. मुंबईतील ह्युमन्स ऑफ बॉम्बे (Humans Of Bombay) या गटातील एका 100 वर्षे वयाच्या आजींची (100 Years Old Grandma)पोस्ट सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे.

    या शतकपूर्ती केलेल्या आजींचं नाव मात्र गुलदस्त्यात आहे. शंभर वर्षांच्या इतिहासाच्या साक्षीदार असणाऱ्या या आजींनी जुन्या काळाच्या आठवणी सांगितल्या असून, काळानुसार होणारे बदल स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे.

    त्यांच्या पोस्टची सुरुवात ‘मी शंभर वर्षे वयाची असून, मी सर्व पाहिलं आहे,’ अशी आहे. त्यांनी गांधीजीना (Mahatma Gandhi) प्रत्यक्ष पाहिलं आहे. त्यांचे वडील तुरुंगाधिकारी होते, त्यामुळं महात्मा गांधींना तुरुंगात असताना अगदी जवळून पाहण्याची संधी मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अडोल्फ हिटलरचा (Hitler) उदय आणि अस्तही त्यांनी पाहिला आहे. इतिहासाचा प्रचंड मोठा कालखंड जवळून पाहणाऱ्या या आजी अनेक ऐतहासिक घटनांच्या साक्षीदार आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्याही (India’s Freedom Fight) त्या साक्षीदार होत्या, त्यात त्यांनी सहभाग ही घेतला होता. स्वतंत्र भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाला मुक्ततेचा गंध होता, असं त्या म्हणतात.

    आताची पिढी कोरोनाच्या साथीमुळे (pandemic)एखाद्या महासाथीचा अनुभव घेत आहे, पण या आजींनी त्यांच्या तरुणपणी याहीपेक्षा भयानक फ्ल्यूच्या साथीचा अनुभव घेतला आहे. त्यांचं लग्न झाल्यावर त्यांनी संसारात वाहून घेतलं तरी स्वतःचा लढाऊ बाणा कायम ठेवला.

    आई शपथ! साडी नेसून मारला जिमनॅस्टिकचा फ्लिप, VIDEO पाहून बसेल आश्चर्याचा धक्का

    पतीच्या रेल्वेतील नोकरीमुळे त्यांना भारतभर प्रवासाचा अनुभव घेता आला. त्यांना तीन मुलं आहेत. मुलांसाठी त्यांचे वडील खूप कडक शिस्तीचे होते, पण मुलांना वाढवण्याबाबत आई म्हणून या आजींचा दृष्टीकोन आधुनिक असल्यानं त्यांनी मुलांना स्वातंत्र्य दिलं, मोकळेपणे वाढू दिलं आणि त्यांना स्वावलंबी केलं. त्यांची वागण्याची पद्धत बघून आजूबाजूच्या इतर महिला त्या पारंपारिक पद्धती न जपता, खूप स्वतंत्र (Free) असल्याची तक्रार करत. पण त्यांच्याकडे त्यांच्या जगण्याचा बहुमोल मंत्र होता, तो म्हणजे काळाबरोबर येणारे बदल स्वीकारा.

    या आजी म्हणतात, त्यांनी त्यांच्या पतीच्या रागाची पर्वा न करता बाहेर डिनरला जाणं, जंक फूड खाणं यांचा मनापासून आनंद घेतला. त्यांच्या या मुक्त विचारसरणीमुळं समाजाशीही संघर्ष करावा लागला तेव्हा त्यांनी केला. त्यांच्या मुलानं परजातीय मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा प्रेमावर विश्वास असलेल्या या आजींनी मुलाला त्याची लव्हस्टोरी यशस्वी होण्याचा विश्वास दिला आणि ती लव्हस्टोरी प्रत्यक्षात आणली.

    बर्फात अडकली अँब्युलन्स; रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी काय केलं; पाहा VIDEO

    आयुष्य रसरसून जगणाऱ्या आजींच्या दीर्घायुष्याची ही प्रेरणादायी पोस्ट फेसबुकवर अतिशय लोकप्रिय झाली असून, आतापर्यंत तब्बल 1.8 हजारांपेक्षा अधिक जणांनी ती शेअर केली आहे. या आजींचा आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन बघून लोक अत्यंत प्रेमानं त्यांना आपल्या कमेंट्समधून दाद देत आहेत.

    First published:

    Tags: Mumbai News