मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Mumbai Rain LIVE VIDEO : मरीन ड्राईव्हची थरकाप उडेल अशी अवस्था; दक्षिण मुंबईत झाडं पडली, रेल्वे ठप्प

Mumbai Rain LIVE VIDEO : मरीन ड्राईव्हची थरकाप उडेल अशी अवस्था; दक्षिण मुंबईत झाडं पडली, रेल्वे ठप्प

 रेल्वे ट्रॅकवर पाणी साठल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. पाहा दक्षिण मुंबईतला थरकाप उडवेल असा VIDEO

रेल्वे ट्रॅकवर पाणी साठल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. पाहा दक्षिण मुंबईतला थरकाप उडवेल असा VIDEO

रेल्वे ट्रॅकवर पाणी साठल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. पाहा दक्षिण मुंबईतला थरकाप उडवेल असा VIDEO

मुंबई, 5 ऑगस्ट : मंगळवारी अतिवृष्टी अनुभवल्यानंतर पुन्हा एकदा मुंबई काळ्या ढगांनी अंधारली आहे. दक्षिण मुंबईत दुपारी तुफानी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.अक्षरशः वाहनांनाही हलवेल असा वारा अनुभवायला मिळतो आहे. पुढचे काही तास धोक्याचे असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कुर्ला ते छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साठल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

पुढच्या 24 तासांसाठी हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या कोकण पट्ट्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दक्षिण मुंबईत वादळासह पावसाचं थैमान सुरू आहे. त्यामुळे मंत्रालय परिसरात झाडं पडली. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशीच मोठं झाड कोसळलं. मरीन ड्राईनव्हची अवस्था तर भीतीदायक झाली होती. मरीन ड्राईव्हववरचा तुफानी वारा पाहून उडेल थरकाप उडेल.

दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी झाडं पडल्यामुळे अनेक रस्त्यांवरील वाहतूक बंद पडली. मुंबई हायकोर्टाबाहेरही झाडं पडली.

मध्ये रेल्वे ठप्प

ट्रॅकवर पाणी साचल्याने सीएसएमटी ते वाशी आणि सीएसएमटी ते कुर्ला वाहतूक ठप्प झाली आहे.

First published:

Tags: Mumbai rain, Weather warnings