Home /News /mumbai /

लज्जास्पद! मुंबईच्या महापौरांनी महिलेचा हात पिरगळला VIDEO आला समोर

मुंबई, 6 ऑगस्ट : विजेचा धक्का लागून आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मुंबईत झाली होती. मृतांच्या नातेवाईकांना भेटायला मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर गेले होते. त्या वेळी काही जणांनी त्यांची वाट अडवायचा प्रयत्न केला. अशा घटना घडतात, तेव्हा कुठे होतात असा जाब विचारणाऱ्या महिलेचा... माझ्यावर दादागिरी करतेस का, असं विचारत महापौरांनी हात पिरगाळला. या व्हिडिओत महापौरांचं वर्तन स्पष्ट दिसत आहे. याविषयी महापौरांना विचारल्यावर ते म्हणाले, मी फक्त हात घालून अडवणाऱ्यांना बाजूला केलं. आरोप करणारे राजकारण करत आहेत. मनसेनं अपघाताचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला, असंही ते म्हणाले.

पुढे वाचा ...

    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: MNS, Shiv sena

    पुढील बातम्या