मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुलुंडमध्ये पॉश सोसायटीनं केली वीजचोरी, रक्कम ऐकून थक्क व्हाल, महावितरणच्या तपासणीत चोरी उघड

मुलुंडमध्ये पॉश सोसायटीनं केली वीजचोरी, रक्कम ऐकून थक्क व्हाल, महावितरणच्या तपासणीत चोरी उघड

मुलुंडच्या एका पॉश सोसायटीमध्ये तब्बल 63.23 लाखाची वीजचोरी (electricity theft) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मुलुंडच्या एका पॉश सोसायटीमध्ये तब्बल 63.23 लाखाची वीजचोरी (electricity theft) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मुलुंडच्या एका पॉश सोसायटीमध्ये तब्बल 63.23 लाखाची वीजचोरी (electricity theft) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    मुंबई, 6 जून : मुलुंडच्या एका पॉश सोसायटीमध्ये तब्बल 63.23 लाखाची वीजचोरी (electricity theft) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलुंडमधील निर्मल लाईफ स्टाईलच्या नवीन बांधकाम झिरकोन को. ऑप. हाऊसिंग सोसायटीत महावितरणच्या तपासणी दरम्यान 1,76,100 युनिटची तब्बल 63.23 लाखाची वीजचोरी झाल्याचे समोर आले आहे. याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात विद्युत कायदा 2003, कलम 135 अन्वये निर्मल लाईफ स्टाईल व झिरकोन को. ऑप. हाऊसिंग सोसायटीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे (एफआयआर-फि. स्था.ख.क्र.67, वर्ष.2021 दि.4.06.2021). याबाबत पोलीस पुढील तपास करत आहे. महावितरणचे अधिकारी आपल्या नियमित चेकिंगसाठी मुलुंड पश्चिम येथील निर्मल लाईफ स्टाईलच्या झिरकोन को. ऑप. हाऊसिंग सोसायटीत गेले असता वीज चोरी होत असल्याचा संशय महावितरणच्या अधिकाऱ्यांना आला. तेथे सखोल चौकशी केल्यानंतर या 39 मजली इमारतीच्या बांधकामासाठी लगतच्या बी. एम. सी.च्या आऊट-गोइंग स्विचला, दुसरी विनामीटर केबल जोडून 2 वर्षांपासून वीजचोरी होत असल्याचे आढळून आले. सदर प्रकारणाबाबत महावितरणने मुलुंड पोलीस ठाण्यात विद्युत कायदा 2003 अन्वये कलम 135 नुसार निर्मल लाईफ स्टाईल व झिरकोन को. ऑप. हाऊसिंग सोसायटीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस याबाबत पुढील चौकशी करत आहेत. महावितरणने, झिरकोन को. ऑप. हाऊसिंग सोसायटीला दंडासोबत रु.63.23 लाखाची रक्कम भरण्यास सांगितले होते. सदर रक्कम ना भरल्यामुळे त्यांच्यावर दि. 4 जून 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना समोर आल्यामुळं आता वीज चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत. सदर, कारवाई महावितरण मुलुंडचे कार्यकारी अभियंता दत्तात्रेय भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोदय उपविभागातील उप कार्यकारी अभियंता शकील पाटील, सहायक अभियंता  प्रशांत भानुशाली व त्यांच्या चमूतील सतीश कुलकर्णी, राजू हुलहुले, श्रीराम कोरडे, जयश्री त्रिंबके, सुनील निंबाळकर यांनी केली. हे वाचा - पंतप्रधान मोदींना सहकाऱ्यांचा विसर? गडकरींपाठोपाठ योगींनाही दिल्या नाही वाढदिवसाच्या जाहीर शुभेच्छा…! त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महावितरण भांडूप परिमंडळचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी स्वतः शाखा कार्यालयात भेट देऊन त्यांचे कौतुक केले आणि त्यांना मार्गदर्शन केले. तसेच या कोरोना काळात जिद्दीने उत्तमरित्या काम करीत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ग्राहकांनी अनधिकृत विजेचा वापर टाळावा व इतरांनाही प्रामाणिकपणे विजेचा वापर करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन मुख्य अभियंता गणेशकर यांनी केले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Mumbai News

    पुढील बातम्या